जालना - शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बजावलेल्या आदेशानुसार जालना-औरंगाबाद जिल्ह्याची सीमा बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे चेक पोस्ट बनवून बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व ई-पास असणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शखाली वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.
जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट -
जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशाने चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसारच जालना-औरंगाबाद जिल्ह्याची सीमा असलेल्या वरुडी येथे बदनापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी स्वतः वाहन तपासणी सुरू केली आहे.
चार पोलिसांचे पथक तैनात -
याठिकाणी चार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. जालना जिल्हा हद्दीत ई-पास असेल किंवा अत्यावश्य सेवा असेल तरच प्रवेश दिला जात आहे. अन्यथा वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.