जालना - राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) रोजी काळ्या फिती लावून काम केले. विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी काम केले.
कामगार कायद्याला स्थगिती देण्यात येऊ नये. केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नयेत. कोरोनाच्या नावाखाली केंद्र व राज्य सरकारने खासगीकरणाला गती देऊ नये, कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच सर्व विभागातील 55 वर्षावरील तसेच, मधुमेह, रक्तदाब आणि दुर्धर आजाराने त्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कामकाजातून सूट मिळावी या आणि अन्य मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज काळ्या फिती लावून काम करण्यात आले. जिल्ह्यामधील विविध कार्यालयांमध्ये या संघटनेचे कर्मचारी आहेत.