ETV Bharat / state

जालना जिल्हा परिषद शिक्षकांचा क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, खेळाडू करणार जिल्ह्याचे नावलौकिक

author img

By

Published : Jan 22, 2021, 1:15 PM IST

जालना जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण असा जिल्हा क्रीडा प्रबोधिनी हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरु केला असून जिल्हा परिषद शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी चालवला आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

खेळाडू करणार जिल्ह्याचे नावलौकिक
खेळाडू करणार जिल्ह्याचे नावलौकिक

जालना - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक केवळ पगारा पुरते काम करतात आणि त्यामुळेच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा असते असा एक समज निर्माण झाला आहे. मात्र हा समज दूर करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण असा जिल्हा क्रीडा प्रबोधिनी हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरु केला असून जिल्हा परिषद शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी चालवला आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जालना जिल्हा परिषद शिक्षकांचा क्रीडा प्रबोधिनी उपक्रम

क्रीडा प्रबोधिनीची सुरुवात
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या अंगात मैदानी खेळा संदर्भात चांगले गुण असतात. त्यांच्यात तितकी शक्ती देखील असते. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन 17 जून 2019 ला क्रीडा प्रबोधिनी ही क्रीडा संस्था जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर उभारण्यात आली. या उपक्रमासाठी विशेष निधी नाही. त्यामुळे मागील वर्षी जिल्हा नियोजन समिती ती आणि काही ही राखीव निधीतून तसेच जिल्हा परिषदेच्या निधीवर येणाऱ्या व्याजातून या इमारतीचीची उभारणी केली. क्रीडा प्रबोधिनीचे कामकाज पाहण्यासाठी जिल्हापरिषदेच्या शिक्षकांकडून प्रत्येकी दोनशे रुपयांची मदत जमा केली आणि कामकाज सुरू झाले.

खेळाडू करणार जिल्ह्याचे नाव लौकिक
खेळाडू करणार जिल्ह्याचे नाव लौकिक

क्रिडा प्रबोधनीचा पाया
सध्या या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल आणि अथलेटिक्स या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. 50 मुले आणि 50 मुली इथे शालेय शिक्षणासोबतच या खेळांचे देखील विशेष प्रशिक्षण घेतात. ही निवासी शाळा असल्यामुळे 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचा इथे समावेश आहे. व्यवस्थापक म्हणून प्रमोद खरात, खो- खो साठी सचिन दोरखे, कबड्डीसाठी रवींद्र ढगे, मैदानी साठी संतोष मोरे या प्रशिक्षकांची नियुक्ती आहे. तर गृह प्रमुख म्हणून विजय खेडेकर, राजीव पुरी, इशानी पेंदम, श्रीमती पेटी,आणि मैदान सेवक म्हणून बळीराम भानुसे, योगेश भुतेकर यांच्याकडे जबाबदारी आहे.

असा केला निधी उभा...
या क्रीडा प्रबोधिनीसाठी शासनाचे अनुदान नसल्यामुळे मागील वर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाला शिक्षकांनी प्रत्येकी दोनशे रुपये जमा करून सुरुवात केली. मात्र त्यानंतर कोरोनामुळे विद्यार्थी निवास बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा या क्रीडा प्रबोधिनीला सुरुवात झाली आणि निधीची कमतरता भासू लागली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी फक्त जिल्हापरिषदेच्या शिक्षकांनाच आवाहन केले. आणि जानेवारीच्या पगारातून एक हजार रुपये जमा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला जिल्हापरिषद शिक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला आणि आणि 5 हजार 919 शिक्षकांपैकी 5 हजार 348 शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचे मान्य केले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील एक हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यातून सुमारे 54 लाखांचा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी या क्रीडा प्रबोधिनीसाठी उभा केला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या आज विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम जालना जिल्ह्याला क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवून देईल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह अधिकाऱ्यांना देखील वाटत आहे. त्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जिल्हाभरात चांगली चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.