जालना - ओल्या दुष्काळी परिस्थितीमुळे भोकरदान तालुक्यातील विद्यार्थ्यांची 2018-19 व 2019-20 या वर्षाची परीक्षा फी माफ करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेने या मागणीचे निवेदन गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे.
हेही वाचा - प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही बोलेन; विदर्भातील पीक नुकसानीच्या पाहणीनंतर पवारांचे आश्वासन
हेही वाचा - राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सन 2018-19 मध्ये भोकरदन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील विध्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली होती. परंतु, शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे भोकरदन तालुक्यातील अनेक शाळांना अद्यापही फी माफीचे चेक मिळाले नाहीत. काही शाळांमध्ये फी माफीचे चेक दिले आहेत. मात्र, त्या चेकचा कालावधी कमी असल्यामुळे सदर चेक रद्द होत आहेत. यामुळे विध्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सन २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षामध्ये भोकरदन तालुक्यात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे आलेले पिके वाया गेले आहे. शेतकऱ्यांकडे मुलांची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भोकरदन तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क व परीक्षा शुल्क तत्काळ माफ करावे, अशी मागणी सेनेने केली आहे. राज्यपालांना व वरिष्ठांना या परिस्थितीबाबत कळवावे. अन्यथा बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने गट शिक्षण अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.