ETV Bharat / state

आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी आखाड्यात पैलवानाच नाहीत, असे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कोणासोबत कुस्त्या खेळायच्या आणि कोणासोबत नाही हे आम्ही ठरवतो.

घनसावंगीच्या सभेत बोलताना शरद पवार
author img

By

Published : Oct 14, 2019, 12:02 AM IST

जालना - आखाड्यात पैलवानच नाहीत असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, ते विसरले आहेत मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्ही पैलवाना सोबतच कुस्त्या खेळतो यांच्यासोबत नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

घनसावंगी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा पवारांनी उपस्थित केला. माझ्या काळात मी शेतकऱ्यांना आत्महत्या करू दिल्या नाहीत. मात्र, हे सरकार शेतकरीविरोधी आहे. कांद्याला भाव देखील मिळू देत नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, त्यामुळे या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका पवारांनी केली.

हेही वाचा - मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल'

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी आखाड्यात पैलवानाच नाहीत, असे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कोणासोबत कुस्त्या खेळायच्या आणि कोणासोबत नाही हे आम्ही ठरवतो. पर्यायाने आम्ही कुस्त्या पैलवान सोबत ठेवतो,(विशिष्ट प्रकारचे हातवारे करत) यांच्या सोबत नाही.

आपण फुल टाईम काम करत असून लोक पार्टटाईम काम करतात. पाच दिवस मुंबईमध्ये बिल्डरचा व्यवसाय आणि दोन दिवस घनसावंगीत अशा प्रकारचा यांचा कार्यक्रम सुरू आहे. टोपे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. विरोधकांनी मुंबईतील व्यवसायतदेखील अनेक घोटाळे केले आहेत. त्यामुळे अशा घोटाळेबाज उमेदवाराला निवडून द्यायचे का? हे जनतेने ठरवावे, असे राजेश टोपे यांनी म्हटले.

Intro:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आखाड्यात पहिलवानच नाही असे म्हणत आहेत ,मात्र मी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहे .त्यामुळे आम्ही पहिलवान सोबतच कुस्त्या खेळतो ह्यांच्यासोबत नाही असे म्हणत विशीष्ट प्रकारचे हातवारे करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली . त्यामुळे घनसांगी च्या मतदारांना शरद पवार यांचे एक नवीन रूप पाहायला मिळाले .घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आज रविवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश टोपे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Body:शेतकऱ्यांच्या या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून माझ्या काळात त् शेतकऱ्यांना आत्महत्या करू दिला नाहीत, मात्र हे सरकार शेतकरीविरोधी आहे, कांद्याला भाव देखील मिळू देत नाही ,शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही ,त्यामुळे या सरकारला खाली खेचल्या शिवाय पर्याय नाही ही असे म्हणत ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखाड्यात पहिलवानाचा नाही असे वक्तव्य केले होते. याचे प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतात ते खरेच आहे, कारण मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कोणासोबत कुस्त्या खेळायच्या आणि कोणासोबत नाही हे आम्ही ठरवतो. पर्यायाने आम्ही कुस्त्या पहिलवान सोबत ठेवतो असे म्हणत विशिष्ट प्रकारचे हातवारे करत यांच्या सोबत नाही असे ते म्हणाले .युती सरकार वर टीका करताना ते म्हणाले की की हे सरकार म्हणजे लबाडाचे आमंत्रण आहे, जेवल्याशिवाय काही खरे नाही .
*आमदार राजेश टोपे*
आपण फुल टाईम काम करत असून लोक पार्टटाईम काम करतात, पाच दिवस मुंबईमध्ये बिल्डर चा व्यवसाय आणि दोन दिवस घनसावंगीत अशा प्रकारचा कार्यक्रम चालूआहे. अशी टीका टोपे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांचे नाव न घेता केली. त्यांची जनतेशी कसल्याही प्रकारची नाळ नाही या उलट गेल्या दोन पिढ्या आम्ही जनतेसोबत घालवले आहेत .विरोधकांनी मुंबईत बिल्डिंगच्या व्यवसायदेखील अनेक घोटाळे केले आहेत, या घोटाळ्याच्या चौकशाही सुरू आहेत ,खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनीच या चौकशा सुरू केल्या आहेत त्यामुळे अशा घोटाळेबाज उमेदवाराला निवडून द्यायचे का? हे जनतेने ठरवावे मात्र आपण तालुक्याचा विकासाचा ध्यास घेतला आहे जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.