जालना - आदिशक्ती संत मुक्ताई यांची पालखी आज मराठवाड्यात आणि जालना जिल्ह्यात आली. जालना जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुढील सहा दिवस ही मुक्कामासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी थांबणार आहे.
विदर्भातले शेवटचे ठिकाण देऊळगाव राजा नंतर पाच किलोमीटर या गावापासून जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. जालना जिल्ह्यातील देऊळगाव राजा ते जालना दरम्यान असलेल्या घाटांमधील मुक्ताईच्या पालखीचे विहंगम दृश्य.