ETV Bharat / state

गुढी पाडव्यानिमित्त रुक्मिणी परिवाराने जपली 'मर्मबंधातील ठेव'

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करून या परिवाराच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन
author img

By

Published : Apr 6, 2019, 5:31 PM IST

जालना - रुक्मिणी परिवाराच्यावतीने गेल्या अठरा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाते घट्ट करण्यासाठी 'मर्मबंधातील ठेव' जपण्याचे कार्य सुरू आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करून या परिवाराच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जालन्यातील रुक्मिणी गार्डन येथे खुल्या रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाचा रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला.

सुमारे दहा वर्षांपूर्वी टीव्हीवर लिटिल चॅम्प या लहान मुलांच्या गायनाच्या कार्यक्रमाने धुमाकूळ घातला होता. याच कार्यक्रमातील ही दोन बालके आता युवा अवस्थेत आहेत. त्यांच्या मर्मबंधातील ठेव या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, अमृताहुनी गोड, अशा सुरेल गायनाने मुग्धाने तर, काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी, सुरत पिया की, या अशा दर्जेदार रचनांनी प्रथमेशने संगीत रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.

लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन

याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातही ही जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय महोत्सवाच्या नावाखाली डॉ. अनिल काकोडकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, मृणाल कुलकर्णी, प्रशांत दामले, यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केल्याच्या चित्रफितीही यावेळी दाखविण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या रुक्मिणी परिवारातील रमेश मगरे, संजय अग्रवाल, राजेंद्र बोथरा, बजरंग भक्कड, मोरेश्वर दळवी, अनिल कुलकर्णी, प्रल्हाद देशमाने, संजय देशपांडे, आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Intro:रुक्मिणी परिवाराच्यावतीने गेल्या अठरा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाते घट्ट करण्यासाठी "मर्मबंधातील ठेव" जपण्याचे कार्य सुरु आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दिनांक 5 रोजी लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करून या परिवाराच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जालन्यातील रुक्मिणी गार्डन येथे खुल्या रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला.

Body:सुमारे दहा वर्षांपूर्वी टीव्ही वर लिटिल चॅम्प या लहान मुलांच्या गायनाच्या कार्यक्रमाने धुमाकूळ घातला होता. याच कार्यक्रमातील ही दोन बालके आता युवा अवस्थेत आहेत.आणि त्यांच्या मर्मबंधातील ठेव या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली" बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ""अमृताहुनी गोड" असे सुरेल गायनाने मुग्धाने तर "काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी"" सुरत पिया की" या अशा दर्जेदार रचनांनी प्रथमेशने संगीत रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भातही ही जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय महोत्सवाच्या नावाखाली डॉ.अनिल काकोडकर, अभिनेत्री निशिगंधा वाड ,मृणाल कुलकर्णी ,प्रशांत दामले, यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केल्याच्या चित्रफितीही ही दाखविण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या रुक्मिणी परिवारातील रमेश मगरे, संजय अग्रवाल, राजेंद्र बोथरा, बजरंग भक्कड,मोरेश्वर दळवी, अनिल कुलकर्णी ,प्रल्हाद देशमाने, संजय देशपांडे ,आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.