ETV Bharat / state

खोतकरांची मनधरणी करत दानवेंनी अर्धी लढाई जिंकली, विरोधकांना पुन्हा देणार का चकवा ?

जालना मतदार संघात १ हजार ८०० गावं येतात. मतदारसंघात जालना जिल्ह्यातल्या ३ आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३ अशा ६ विधानसभेच्या जागा येतात. समाजाचे आणि जातीय राजकारणावरून कोणता उमेदवार येईल हे निश्चित सांगता येत नाही.

author img

By

Published : Apr 6, 2019, 2:14 PM IST

रावसाहेब दानवे, विलास औताडे

जालना - शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची मनधरणी करत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जानला लोकसभेची अर्धी लढाई जिंकली आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील ६ निवडणुकांपासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. त्यापैकी ४ वेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत. यावेळी ते पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विलास औताडे यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर मागच्या निवडणुकीवेळी बसपकडून निवडणूक लढवणारे डॉ. शरदचंद्र वानखेडे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर बसपकडून महेंद्र सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती
भाजप सेनेची युती होण्याआधी जालना मतदार संघाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. या मतदार संघाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मागील २० वर्षापासून करत आहे. मात्र, शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवून दानवे यांचा पराभव करु, असं जाहीर भाषणातून सांगितले होते. सोबतच दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना धडा शिकवण्यासाठी, जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनीही केली होती. मात्र, या दोन्ही घोषणा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. रावसाहेब दानवे अर्जुन खोतकराचे बंड शमवलं तर बच्चू कडूंनीही त्यांची उमेदवारी मागे घेतली. यामुळे ही निवडूक दानवेंनी सोपी केल्याचे बोलले जात आहे. तर दानवेंच्या याच एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी सर्वार्थाने सक्षम उमेदवार कसा द्यावा, हा काँग्रेसपुढे प्रश्न होता. त्यासाठी त्यांच्याकडून शोधही घेण्यात आला. मात्र, उमेदवार न मिळाल्याने काँग्रेसकडून विलास अवताडे यांना पुन्हा संधी देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पक्षीय बलाबल
जालना - अर्जुनराव खोतकर (शिवसेना)
बदनापूर - नारायण कुचे (भाजप)
भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे (भाजप)
फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजप)
सिल्लोड - अब्दुल सत्तार (काँग्रेस)
पैठण - संदिपान भुमरे( शिवसेना)

मतदारांची एकूण संख्या - १८ लाख ४५ हजार ६६
पुरूष मतदार - ९ लाख ७७ हजार ७४९
महिला मतदार - ८ लाख ६५ हजार ३७६

जालना लोकसभेची निवडणूक दानवेंसाठी सोपी असल्याचे बोलले जात आहे. सोबतच जालना शहरातील रस्ते, नगरपालिकेच्या लाईटची आणि पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मी निधी आणला. केमिकल कॉलेज, ड्रायपोर्ट आणि अन्य महत्त्वाच्या प्रकल्प मी सुरू केले असल्याचा दावा दानवे करत आहेत. भोकरदन बदनापूर या दोन विधानसभा मतदारसंघावर भाजपची चांगली पकड आहे. सोबत शहरातही दानवेंचा चांगला प्रभाव आहे. याचा ही दानवेंना फायदा होईल असे म्हटले जात आहे.

शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा दानवेंना विरोध
मात्र, दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य त्यांच्या पथ्यावर पडू शकते. शिवाय शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही दानवेंना विरोध असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसापूर्वी राज्यमंत्री खोतकर यांच्या बंगल्यावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी जाहीरपणे ही खुमखुमी बोलून दाखवली. त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवे यांचा कितीही प्रचार केला तरी शिवसैनिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे. यापूर्वी ही नाराजी फक्त दानवे पुरती होती. मात्र, आता अर्जुन खोतकर यांनी देखील रावसाहेब दानवे यांच्यासोबत जुळते घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. शिवसैनिकांना लढवत ठेवून आपापसात भांडणे लावून हे दोघेही एकत्र झाले आहेत. अशी खात्री शिवसैनिकांची झाली आहे. त्यामुळे हा नाराज गट काँग्रेसकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भातील भाकीतही काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आठ दिवसापूर्वी व्यक्त केले आहे. त्यामुळे यांच्या दोघांचा भांडणाचा फायदा शिवसैनिकांनी जर ठरवले तर काँग्रेस पक्षाला होऊ शकतो. तसेच जालना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दानवेंनी ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे जालना शहरातील ब्राह्मण मतदार देखील खासदार दानवे यांच्यावर नाराज आहे.

याउलट काँग्रेसचे विलास अवताडे हे मागच्या वेळी पराभूत झाल्यानंतर मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असे स्थानिकांचे मत आहे. मात्र दानवेंचे शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि शिवसैनीकांची नाराजी अवताडेंसाठी सकारात्मक ठरू शकते. त्यामुळे आत्ता जरी सोपी वाटत असलेली ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये चांगलेच रंग भरणार असल्याचेही म्हटले जात आहे. बहुजन वंचित आघाडी यावेळी नवा पर्याय उभा करत आहेत. त्यामुळे ते किती मतदार यावेळी खेचणार हेही पाहणे महत्वाचे ठरेल. शिवाय बसप राष्ट्रीय पक्ष असल्याने या उमेदवाराला देखील बऱ्यापैकी मत पडण्याची अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांनी कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने अंबड चौफुली येथील एका मंगल कार्यालयात मेळावा घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. याउलट भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शक्तिप्रदर्शन करून खर्चातही वाढ केली आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचसोबत स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडासंकुलात मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करून आणि समोर असलेल्या मैदानात चक्कर मारून दानवे यांनी उपस्थित मतदारांना अभिवादनही केले या दोघांच्या या कार्यक्रमानंतर अजून पर्यंत अन्य पक्षांचा कुठलाही मोठा कार्यक्रम जालना शहर तथा मतदारसंघात झाला नाही.

मतदारसंघातील प्रश्न
बीड-जालना-खामगाव रेल्वेचा प्रश्न गेल्या १५ वर्षापासून प्रलंबित आहे. जुन्या औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग बंद पडले आहेत. या उद्योगधंद्यांच्या जागा रिकाम्या पडून आहेत. त्या जागा जर इतर व्यावसायिकांना देण्याची मागणी येथील स्थानिक लोक करत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अद्यापही पूर्ण झाला नाही. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असतानाही अद्याप चारा छावण्या सुरु झाल्या नाहीत.

जातीनिहाय मतदारांची संख्या
मुस्लिम समाजाचे ३ लाख ८० हजार
जातनिहाय जर आढावा घेतला तर सुमारे चार लाख मुस्लिम ३ लाख 80 हजारएस सी, दोन लाख 10 बंजारा वंजारी ,70हजार विश्वकर्मा एक लाख 70, धनगर 80 हजार माळी, आणि उर्वरित सुमारे नऊ लाखांमध्ये खुला प्रवर्ग आहे. त्यामुळे समाजाचे आणि जातीय राजकारणावरून कोणता उमेदवार येईल हे निश्चित सांगता येत नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.