ETV Bharat / state

Rajesh Tope on School Reopening : राज्यातील शाळा उद्यापासून होणार सुरू, कोरोना नियमांचे पालन करा  - राजेश टोपे - राज्यातील शाळा होणार सुरू

शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on School Reopening) यांनी दिली आहे.

rajesh tope
rajesh tope
author img

By

Published : Jan 23, 2022, 5:33 PM IST

जालना : उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on School Reopening) यांनी दिली आहे.ते जालन्यात बोलत होते.

लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मने एक सर्वेक्षण केलं असून त्यात, 62 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून शाळा सुरू करण्याचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं. लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील,असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात लस घेणं सक्तीचं नाही. मात्र, नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणं त्यांना भाग पाडू असं सांगत सध्या लता मंगेशकर यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

हेही वाचा - Uday Samant criticizes BJP : ..हे तर आमचे दुर्दैव, उदय सामंतांची भाजपावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.