जालना - गुरुवारी राज्यातील तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यांच्यावर उपचारासाठी (transgender treatment) मेडिकल कॉलेज आणि शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वार्ड तसेच स्वतंत्र रूम देण्यासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope in Jalna) यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते.
तृतीयपंथीयांच्या आरोग्य विषयक प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक -
तृतीयपंथीयांना वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या असून शासकीय रुग्णालयात उपचार घेताना त्यांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेजमध्ये स्वतंत्र वार्ड तसेच रूम मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.