ETV Bharat / state

जिल्ह्यात 50 टक्के कोविड-19 रुग्णांवर रेमडीसीविर इंजेक्शनचा वापर, सकारात्मक परिणाम - Jalna corona positive patient latest news

जिल्ह्यातील सुमारे सहा हजार रुग्णांपैकी तीन हजार रुग्णांना रेमडिसीविर या इंजेक्शनचा चांगला फायदा झाला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आल्याचे डॉक्टरांनी मान्य केले आहे. जिल्ह्यात सामान्य रुग्णालय आणि अन्य चार खाजगी रुग्णालये अशा एकूण पाच रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील 6 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले.

रेमडीसीविर इंजेक्शन न्यूज
रेमडीसीविर इंजेक्शन न्यूज
author img

By

Published : Sep 10, 2020, 5:19 PM IST

जालना - कोविड-19 या आजाराने त्रस्त असलेल्या जालना जिल्ह्यातील सुमारे सहा हजार रुग्णांपैकी तीन हजार रुग्णांना रेमडिसीविर या इंजेक्शनचा चांगला फायदा झाला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आल्याचे डॉक्टरांनी मान्य केले आहे. जिल्ह्यात सामान्य रुग्णालय आणि अन्य चार खासगी रुग्णालये अशा एकूण पाच रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील 6 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी सुमारे 50 टक्के म्हणजेच तीन हजार रुग्णांवर रेमडिसीविर या इंजेक्शनचा वापर करण्यात आला आहे.

रेमडीसीविर इंजेक्शन न्यूज
रेमडीसीविर इंजेक्शन न्यूज
कोविड-19 रुग्णांवर रेमडीसीविर इंजेक्शनचा सकारात्मक परिणाम

कोविड-19 शासकीय रुग्णालयात मंगळवार (ता. 8) पर्यंत 752 रुग्णांवर याचा वापर करण्यात आला आणि 139 इंजेक्शन या हॉस्पिटलमध्ये शिल्लक आहेत. शहरातील अन्य चार खासगी कोविड-19 रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 2 हजार 800 इंजेक्शन्स आली आहेत. त्यापैकी 2 हजार 200 इंजेक्शनचा वापर झाला आहे. आणि 600 इंजेक्शन या रुग्णालयांमध्ये शिल्लक आहेत. सर्व हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. या इंजेक्‍शनचा रुग्णांवर चांगला परिणाम झाला असल्याचे शासकीय आणि खासगी डॉक्टरांनी सांगितले आहे.

असा आहे डोस
इंजेक्शनची मात्रा 100 मिलीग्रॅम
किंमत 5 हजार 400 रुपये
गंभीर रुग्णास सहा इंजेक्शन्स
मध्यम स्वरूपाच्या रुग्णाला तीन डोस
पहिल्या दिवशी 2 इंजेक्शन्स आणि अन्य चार दिवशी रोज एक याप्रमाणे

औषध प्रशासनाचे आहे नियंत्रण

हे इंजेक्शन खुल्या बाजारात उपलब्ध नाही. संबंधित कोविड-19 रुग्णालये कंपनीकडे याची मागणी करतात. त्यानुसार कंपनीमधून थेट संबंधित रुग्णालयाला हे इंजेक्शन पाठवले जाते. दरम्यान, कंपनीने कोणत्या विभागात किती इंजेक्शन पाठवली आहेत, याची माहिती कंपनी अन्न व औषधी प्रशासनाच्या विभागीय संचालकांना पाठवते. त्यानुसार विभागीय संचालक त्या त्या जिल्ह्यातील औषध निरीक्षकांना या इंजेक्शनविषयी माहिती पुरवत आहे. त्यानुसार स्थानिक औषध निरीक्षक या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, म्हणून याच्या वापरावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.