ETV Bharat / state

धक्कादायक; स्वयंपाकघरात पडला 15 फूट खोल खड्डा, परिसरात चर्चांना उधाण

author img

By

Published : Jun 25, 2020, 8:11 PM IST

पावसाने जोरदार मारा केल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र बदनापुरातील मध्यवस्तीत असलेल्या एका घरात सहा ते सात फूट रुंद व जवळपास 15 ते 20 फूट खोल खड्डा पडल्याने या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

kitchen
स्वयंपाकघरात पडलेला खड्डा दाखवताना नागरिक

जालना - बदनापूर तालुक्यात पावसाने जोरदार मारा केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बदनापुरातील मध्यवस्तीत असलेल्या एका घरात सहा ते सात फूट रुंद व जवळपास 15 ते 20 फूट खोल खड्डा पडल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा केला असला, तरी हा खड्डा कशामुळे पडला या बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

kitchen
स्वयंपाकघरात पडलेला खड्डा

बदनापूर तालुक्याला बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार मारा केल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट आहे. बदनापुरातील मध्यवस्ती असलेल्या पवार गल्ली येथील रहिवासी नामदेव पवार यांच्या स्वयंपाक घरात मध्यरात्रीनंतर बाहेर पाऊस सुरू असतानाच अचानक सात ते आठ फूट रुंद व जवळपास पंधरा ते वीस फूट खोल असा खड्डा पडला. या खड्ड्यात स्वयंपाकघरातील सर्व भांडे, जीवनावश्यक वस्तू पडल्याने पवार यांचे प्रचंड नुकसान झाले. राहत्या घरात अचानक एवढा मोठा खड्डा कसा पडला, या बाबत उलट सुलट चर्चा होत आहे.

जास्त पाऊस झाल्यानंतर पाण्याच्या दाबाने भूमी स्खलनामुळे अशी घटना घडू शकते, असे जाणकार म्हणतात. तरी एवढा मोठा खड्डा चक्क घरात पडल्याने या भागात गूढ चर्चा रंगत आहेत. काहींच्या मते हे जुने भुयार असू शकते, अशी भावना आहे. दरम्यान, या बाबत आरोग्य सभापती संतोष पवार यांनी तात्काळ महसूल विभागाला माहिती देऊन हा खड्डा कसा पडला, याचे शोध करावा, प्रसंगी भूगर्भ तज्ज्ञांची मदत घेऊन ग्रामस्थाला तात्काळ मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर महसूल प्रशासनाने तात्काळ या ठिकाणचा पंचनामा केला. यावेळी तलाठी होळकर यांच्यासह महसूलचे कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. घरात अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.