ETV Bharat / state

दिलासादायक..! जालन्यात यंदा पाण्याच्या टँकरची संख्या घटली - जालना पाऊस परिस्थिती

गेल्यावर्षी सातशे ते साडे सातशे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तो यंदा फक्त 50 टँकरवर आल्याचे दिलासादायक चित्र आहे.

जालना
जालना
author img

By

Published : Aug 6, 2020, 6:41 PM IST

जालना - जिल्ह्यात यावर्षी फक्त 50 टँकर पाणीपुरवठ्यासाठी सुरू होते. त्यामुळे कोरोनाची साथ वगळता यंदाचा उन्हाळा जालनाकरांसाठी समाधानकारक राहिला, असे म्हणता येईल. मागील वर्षी भर पावसाळ्यातदेखील पाऊस न पडल्याने शेवटच्या टप्प्यात सातशे ते साडेसातशे टँकर सुरू होते. मात्र, परतीचा पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील सर्व तलाव तुडुंब भरले.

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा जायकवाडी आणि संत गाडगेबाबा तलावदेखील भरून वाहू लागले. त्यामुळे शहराला पाण्याची अडचण भासली नाही. तसेच ग्रामीण भागात यावर्षी सुरुवातीपासून टँकरची मागणी नव्हती. मात्र, शेवटच्या टप्प्यामध्ये 30 जूनपर्यंत जास्तीत जास्त 50 टँकरने पाणीपुरवठा केला गेला. यामध्ये सर्वात जास्त 17 टँकर अंबड आणि बदनापूर तालुक्यात सुरू होते. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण 50 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला गेला. त्यामध्ये जालना 5, बदनापूर 17, भोकरदन 0, जाफराबाद 5, परतूर 0, मंठा 5, अंबड 17 आणि घनसावंगी 1 अशा एकूण 50 टँकरने हा पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

109 विहिरींचे केले होते अधिग्रहण

उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील 109 विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. 63 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी या विहिरींची तरतूद करून ठेवली होती. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा उन्हाळा जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक होता. तसेच पुढच्याही उन्हाळ्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता सद्य परिस्थितीवरून दिसत नाही.

जालना शहराचा विचार केला तर नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगेबाबा जलाशय (घाणेवाडी) कालच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. त्यामुळे नवीन जालन्याचा पाणी प्रश्न सुटलेला आहे. जुना जालनेकरांना पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी येत असल्यामुळे त्यांचाही पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. जालना, पैठण या जलवाहिनीवरच अंबड शहराचाही पाणीपुरवठा अवलंबून असल्याने अंबडलाही पाणी टंचाई भासणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.