ETV Bharat / state

जालना मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा नाहीत, प्रचार थंडच - constituency

जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, निवडणुकींचा प्रचार अजूनही थंड आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2019, 12:22 PM IST

जालना - जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, निवडणुकींचा प्रचार अजूनही थंड आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची सभा अद्यापपर्यंत जालना शहरात किंवा लोकसभा मतदारसंघात झाली नाही. त्यामुळे निवडणूक असूनही मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती नसल्यामुळे मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून २० उमेदवार खासदार होण्यासाठी २३ एप्रिलला आपले नशीब आजमावणार आहेत. अवघ्या १० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. मात्र, राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष पक्षांच्या कोणत्याही उमेदवाराची अद्यापपर्यंत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे मतदारराजा आश्‍चर्य व्यक्त करीत आहे. अद्यापपर्यंत कोणतेच नेते प्रचाराला फिरकले नाहीत? त्यातच दैनिकांमध्ये निवडणुकी संदर्भात येणाऱ्या बातम्या देखील रोडावल्या आहेत.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, सध्या खेड्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे, त्यामुळे शहरात अजून कुठल्याही सभा घेतल्या गेल्या नाहीत. पुढील आठवड्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा जालन्यामध्ये आणि लोकसभा मतदारसंघात घेतल्या जातील, अशी माहिती दिली. मात्र हे दिग्गज नेते कोण असतील हे कळाले नाही. प्रचंड उन्हामुळे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले असताना उमेदवारांचा प्रचार मात्र थंडच आहे.

Intro:जालना लोकसभा मतदारसंघाचे मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले आहे.असे असतानाही तापत्या उन्हामध्ये प्रचार मात्र अजून थंड आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची एकही सभा अद्यापपर्यंत जालना शहरात किंवा लोकसभा मतदारसंघात झाली नाही. त्यामुळे निवडणूक असूनही वातावरण निर्मिती नसल्यामुळे मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Body:जालना लोकसभा मतदार संघातून वीस उमेदवार आपले खासदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नशीब आजमावत आहेत. दिनांक 23 एप्रिल रोजी यांच्या नशिबावर मतदार शिक्कामोर्तब करणार आहेत .अवघ्या दहा दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष किंवा राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष पक्षांच्या कोणत्याही उमेदवाराची अद्यापपर्यंत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे मतदार राजा अश्‍चर्यही व्यक्त करीत आहे .अद्याप पर्यंत कोणीच कसे नेते प्रचाराला फिरकले नाहीत ?याच सोबत दैनिकाच्या बातम्या देखील आता कमी झाले आहेत .
दरम्यान याविषयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, सध्या खेड्यांमध्ये दारात जाऊन प्रचार सुरू आहे ,त्यामुळे शहरात अजून कुठल्याही सभा घेतल्या गेल्या नाहीत. असे सांगून पुढील आठवड्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा जालन्यामध्ये आणि लोकसभा मतदारसंघात घेतल्या जातील अशी माहितीही दिली .मात्र हे दिग्गज नेते कोण असतील याबद्दल मात्र गोपनीयता पाळली जात आहे .एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत वातावरण पाहता तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेले असताना उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा मात्र थंड आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.