ETV Bharat / state

राज्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - राजेश टोपे

author img

By

Published : Aug 30, 2021, 2:18 PM IST

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दोन डोस घेणे बंधनकारक राहणार आहे. हे नियम चाकरमान्यांनी पाळावे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात सरकारच्या नकारानंतर देखील दहीहंडी साजरी करणार या मनसेच्या निर्णयावर देखील टोपे यांनी भाष्य केले.

rajesh tope
राजेश टोपे

जालना - राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय अजून झाला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यांच्याशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावावी अशी शिफारस केलेली आहे. मात्र, मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दोन डोस घेणे बंधनकारक राहणार आहे. हे नियम चाकरमान्यांनी पाळावे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात सरकारच्या नकारानंतर देखील दहीहंडी साजरी करणार या मनसेच्या निर्णयावर देखील टोपे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सण-उत्सव सर्वांच्याच आवडीचे असतात. मात्र, नियमात राहून आणि शासनाच्या नियमांचे पालन करून दहीहंडी साजरी करावी, असे आवाहन टोपे यांनी केलं.

हेही वाचा - सगळ्याच बाबतीत कमिशन खाणाऱ्या सरकारला, मंदिरातही कमिशन पाहिजे का? - राधाकृष्ण विखे पाटील

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजप राज्यभर शंखनाद आंदोलन करत आहे. मात्र, सध्या सर्वांनी जनहिताच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा घटत असून मृत्यूचा आकडा देखील घटत आहे, अशीही माहिती टोपे यांनी दिली. जो डॉक्टर कोरोनाबाधितांची हेळसांड करतो त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही यावेळी ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.