ETV Bharat / state

Rajesh Tope Appeal : जायकवाडी धरणातून 10 हजार क्युसेकने होणार पाण्याचा विसर्ग; सतर्कता बाळगण्याचे राजेश टोपेंचे अवाहन - जायवाडी धरणाची लेटेस्ट बातमी

वरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात प्रचंड पाणीसाठा वाढला आहे. पाणीसाठा वाढल्याने जायकवाडी धरणातून उद्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

Rajesh Tope Appeal
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 25, 2022, 5:51 PM IST

जालना - नाशिक आणि नगर भागात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पाणीपातळी वाढल्याने 26 जुलैला सकाळी धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन केले आहे.

राजेश टोपेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक - जायकवाडी धरणात प्रचंड पाण्याची आवक येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्णाण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन काय उपाययोजना करत आहे, यासाठी माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी जायकवाडी धरणांच्या अभियंत्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी जायकवाडी धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यातील वाढीविषयी माहिती दिली. जायकवाडी धरणात प्रचंड पाणीसाठा वाढत असल्याने उद्या विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

  • जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. नाशिक व नगर परिसरात भरपूर पाऊस झाल्याने जायकवाडी धरण ९० टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. यामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून उद्या सकाळी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.आज याबाबतीत मी बैठक घेतली. pic.twitter.com/7ocjwFrYmh

    — Rajesh Tope (@rajeshtope11) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जायकवाडीतून 10 ते 12 हजार क्युसेकने होणार विसर्ग - वरील धरणांचा पाणीसाठा वाढल्याने जायकवाडी धरणात प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकतवाडी धरणांची पाणी पातळीही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जायकवाडी धरण भरत आल्याने त्यातून विसर्ग करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग 26 जुलैला धरणातून 10 ते 12 हजार पाण्याचा विसर्ग करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन - जायकवाडीतून पाण्याचा प्रचंड प्रमाणात विसर्ग होणार असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या विसर्गामुळे नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या जनावरांसह नदीकाठी जाऊ नये, जनावरांना नदीत उतरवू नये, आपली पाणी देण्याची मशीन आजच नदीबाहेर काढून ठेवावी, कोणीही पोहण्यासाठी नदीत उतरू नये, आदी सूचना केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.