ETV Bharat / state

साडेतीन पीठाच्या शक्तीचे वास्तव्य म्हणजे अंबडची 'मत्स्योदरी देवी'

जिल्ह्यातील अंबड येथील मत्स्योदरी देवी येथे तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूरही देवीची तीन पीठे आणि सप्तशृंगीचे अर्धपीठ अशा साडेतीन पीठांचे वास्तव्य आहे. नवरात्रीनिमित्त येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

अंबडची मत्स्योदरी देवी
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:54 PM IST

Updated : Oct 6, 2019, 9:13 PM IST

जालना - शहरापासून 25 किलोमीटरवर अंतरावर अंबड हे गाव आहे. गावालगतच देव माशाच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराच्या कपारीतमध्ये तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूरही देवीची तीन पीठे आणि सप्तशृंगीचे अर्धपीठ अशा साडेतीन पीठांचे वास्तव्य आहे. माशासारखा आकार असलेल्या डोंगराच्या कपारीत ही तिन्ही पिठे एकत्र असल्यामुळे या देवीला मच्छ आणि उदरी म्हणजेच माशाच्या पोटातील देवी म्हणजे 'मत्स्योदरी' असे नाव पडले.

अंबड ची 'मत्स्योदरी देवी

महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे तिन्ही देवीच्या रूपाचे 3 तांदळे आपल्याला येथे पाहायला मिळतात. असे सांगण्यात येते की, मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केली आणि त्यामधून या देवी येथे प्रकट झाल्या. या देवींची कोणीही स्थापना केलेली नाही. नवसाला पावणारी देवी अशी देखील लोकांची धारणा आहे. उंच डोंगरावर वसलेल्या देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना पायर्‍या चढून जावे लागते. सातव्या माळेला या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. सातव्या माळेला रात्रीच्या अतिषबाजीनंतर आठव्या माळेला रात्री बारा वाजता होम हवनला सुरुवात होते. याची पूर्णाहुती नवव्या माळेला सकाळी सहा वाजता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पूर्ण होते. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सीमोल्लंघनासाठी नवीन तहसील कार्यालयापासून जुन्या तहसील कार्यालयमार्गे शहरातील नागरिक देवी मंदिरापर्यंत येऊन सीमोल्लंघन करतात.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त येथे मोठी यात्राही भरते. या सर्व कार्यक्रमांचा समारोप अश्विनी पौर्णिमेला प्रक्षाळ पूजा आणि दुपारच्या महाप्रसादाने होते. मंदिर संस्थानच्यावतीने मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे चालू आहेत. यामध्ये भक्तनिवास, पक्षी घर, दगडी पायऱ्या, महाप्रवेश द्वार ,बहुउद्देशीय हॉल, कमळाचा हौद आदींचा समावेश आहे.

हेही वाचा- जालन्यात महालक्ष्मीचा अवतार मंमादेवी; मंदिराच्या काच कामाला लागली आठ वर्ष

अंबडचे तहसीलदार हे मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष असून सध्या श्रीमती मनीषा मेने या काम पाहत आहेत. सोबत विश्वस्त म्हणून बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख ,बाबासाहेब कटारे, वसंतराव बल्लाळ, दत्तात्रय जोशी, यांच्यासह सहसचिव म्हणून नायब तहसीलदार बाबूराव चंडोल आणि मंदिराचे व्यवस्थापक म्हणून कैलास शिंदे, आणि त्यांना मदत करण्यासाठी मंडलाधिकारी दिवाकर जोगलादेवीकर हे या परिस्थितीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा- जालना शहरात सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात

Intro:अंबड हे नाव भाविक भक्तांसाठी नवीन नाही, जालना शहरापासून 25 किलोमीटरवर असलेले आहे अंबड गाव, गावालगतच देव माशाच्या आकाराचा डोंगर आहे ,या डोंगराच्या कपारीत मध्ये तुळजापूर ,कोल्हापूर, आणि माहूरही देवीची तीन पीठे आणि सप्तशृंगी चे अर्धपीठ अशा साडेतीन पिठांचे वास्तव्य येथे . माशासारखा आकार असलेल्या डोंगराच्या कपारीत ही तिन्ही पिठे एकत्र असल्यामुळे या देवीला मच्छ आणि उदरी म्हणजेच माशाच्या पोटातील देवीम्हणजे "मत्स्योदरी" असे नाव पडले .महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, असे तिन्ही देवींच्या रूपाचे 3 तांदळे आपल्याला पाहायलायेथे पहावयास मिळतात. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केली आणि त्यामधून या देवी येथे प्रकट झाल्या ,असे सांगण्यात येते की या देवींची ही कोणीही स्थापना केलेली नाही. त्या स्वयंभू प्रकट झालेल्या आहेत.

Body:नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या देविका कडे पाहण्याचा भाविकांचा दृष्टिकोन आहे. उंच डोंगरावर वसलेल्या देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना अनेक पायर्‍या चढून जावे लागते. त्यानंतर एका छोट्याशा बोगद्यातून देवी पर्यंत पोहोचून दर्शन घेतल्यावर दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ व्हावे लागते. देवीच्या समोर जेमतेम चार पाच भाविक उभे राहतील एवढीच जागा आहे. अन्य कुठल्याही ठिकाणाहून देवीचे दर्शन होत नाही. संतती प्राप्तीसाठी भाविकांनी केलेले नवस आणि आणि त्यानंतर त्यांना पावलेली देवी याची परतफेड म्हणून नवसा मुळे झालेली संतती देवीच्या ओटीत टाकण्याची परंपराही येथे आहे .पूर्वी ही परंपरा मंदिराच्या वरच्या मजल्यावरून मुले ओटीत टाकण्याची होती मात्र मध्यंतरीच्या काळात या प्रथेला अडचण आल्यामुळे आता ती मंदिराच्या गाभार्‍यातच् सुरू आहे. सातव्या माळेला या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होते. भर उन्हामध्ये भाविक या देवीच्या पुढे नसतं नतमस्तक होण्यासाठी चार ते पाच घंटे पायऱ्यांवर प्रतीक्षा करतात.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे.सातव्या माळेला रात्रीच्या अतिषबाजी नंतर आठव्या माळेला रात्री बारा वाजता होम हवनला सुरुवात होते. आणि याची पूर्णाहुती नवव्या माळेला सकाळी सहा वाजता ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पूर्ण होते. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सीमोल्लंघनासाठी नवीन तहसील कार्यालयापासून जुन्या तहसील कार्यालय मार्गे शहरातील नागरिक देवी मंदिरा पर्यंत येउन सीमोल्लंघन करतात .आणि शमीपूजन केले जाते.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त येथे मोठी यात्राही भरते या सर्व कार्यक्रमांचा समारोप अश्विनी पौर्णिमेला प्रक्षाळ पूजा आणि दुपारच्या महाप्रसादाने होतो. मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे चालू आहेत .यामध्ये भक्तनिवास, पक्षी घर, दगडी पायऱ्या, महा प्रवेश द्वार ,बहुउद्देशीय हॉल ,कमळाचा हाऊद, आदींचा समावेश आहे. अंबड चे तहसीलदार हे मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष असून सध्या श्रीमती मनीषा मेने या काम पाहत आहेत. सोबत विश्वस्त म्हणून बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख ,बाबासाहेब कटारे, वसंतराव बल्लाळ, दत्तात्रय जोशी, यांच्यासह सहसचिव म्हणून नायब तहसीलदार बाबूराव चंडोल आणि मंदिराचे व्यवस्थापक म्हणून कैलास शिंदे, आणि त्यांना मदत करण्यासाठी मंडलाधिकारी दिवाकर जोगलादेवी कर हे या परिस्थितीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवून आहेत.

Conclusion:
Last Updated : Oct 6, 2019, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.