बदनापूर (जालना) - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बदनापूर येथील प्रशासकीय व पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आल्याने कोरोनाचा शिरकाव तालुक्यात न होऊ देण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. बदनापूर शहरात सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत भाजीपाला व किराणा दुकाने उघडण्याची परवानगी आहे. असे असले तरी भाजीपाला व फळांची दुकानांसाठी कृषी उत्पनन बाजार समितीत जागा देण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणची दुकाने शहरात विविध ठिकाणी भरवल्यास या दुकानदारांची ग्राहकीही वाढेल व सोशल डिस्टेन्सींगही पाळता येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान थोडेसे दूर असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंदी असतानाही काही विक्रेते थांबत असल्याने सोशल डिस्टन्स पाळणे अवघड होत आहे.
कोरोना रोगराई पसरू नये यासाठी बदनापूर येथील तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. त्या अनुषंगानेच गावातील गर्दी कमी व्हावी व सोशल डिस्टेंन्सिगचे पालन करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने बदनापूर शहरातील किराणा व भाजीपाला – फळे आदी दुकाने सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 7 उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशामुळे सकारात्मक परिणाम झाला असून शहरातील गर्दी कमी हेाण्यास मदत झालेली आहे. नगरपंचायतच्यावतीने भाजीपाला व फळांची दुकाने कृषी उत्पनन बाजार समितीच्या मैदानावर अंतर राखून ठरवून दिलेल्या जागेत लावावी, असे सुचवल्यानंतर सकाळच्या व सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी भाजीपाला व फळांची दुकाने लावली जातात. तथापि, गावापासून हे अंतर जास्त असल्यामुळे म्हणावे तसे ग्राहक या ठिकाणी जात नाहीत. तसेच एकाच ठिकाणी सर्व दुकाने असल्यामुळे काही वेळा गर्दी होऊन सोशल डिस्टेन्सिंगचे पालन होण्यास अडचण निर्माण हेात आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे व वाहनबंदी (पेट्रोल बंदी) पार्श्वभूमीवर गावापासून या मैदानापर्यंत पायी जावे लागत असल्यामुळे ग्राहकांचीही तारांबळ होत आहे. याचा परिणाम या विक्रेत्यांवर होत असून त्यांची गिऱ्हाईकी कमी होत आहे. पुढील आठवड्यापासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात होत आहे. दिवसभर उपवास धरून सायंकाळी खरेदीसाठी हे बांधव निघण्याची शक्यता आहे. त्यांनाही गावापासून ही जागा दूर असल्यामुळे व एकाच वेळी गर्दी होण्याच्या शक्यतेमुळे नगर पंचायतने या ठिकाणासह इतर चार ते पाच ठिकाणी मोकळ्या जागा बघून त्या ठिकाणी भाजीपाला व फळांच्या विक्रेत्यांना दुकाने उभी करण्याची परवागनी दिल्यास गर्दी कमी हेाऊन सोशल डिस्टेन्सिंगचे पालन होत गिऱ्हाईक संख्या वाढण्यासही मदत हेाऊ शकते.
या बाबत स्वच्छता व आरोग्य सभापती संतोष पवार यांनी सांगितले की, पुढील आठवड्यापासून पवित्र रमजान सुरू होणार असल्यामुळे ग्राहक संख्या वाढून फळांच्या दुकानांवर गर्दी होऊ शकते. म्हणून या विक्रेत्यांना शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानासह आणखी चार ठिकाणी जागा उपलब्ध हेाऊ शकते. रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कन्या प्रशालेसमोरील मोकळ्या जागेत, महिको मैदानात व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळच असलेल्या रिकाम्या जागेवर विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली, तर या विक्रेत्यांचा धंदाही वाढेल. सोबतच ग्राहकांना जवळ सेवा मिळून गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीने त्यांनी नगर पंचायतकडे पाठपुरावा सुरू केला असून रमजान सुरू होण्यापूर्वी नगर पंचायतमार्फत भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील वेगवेगळया ठिकाणी जागा ठरवून देण्याचे नियोजन करण्यात येईल असे सांगितले.
भाजीपाला व फळ विक्रेत्यांना बदनापूर शहरात चार पाच ठिकाणी जागा द्याव्या
लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आल्याने कोरोनाचा शिरकाव तालुक्यात न होऊ देण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे