ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष - पाऊचवर बंदी आल्याने मिनरल वॉटरचे प्लांट संकटात, जार उद्योग तेजीत - पाणी पाऊचवर बंदी जालना

प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पाऊचमध्ये पाणी विक्री करण्यास बंदी घातल्यामुळे, मिनरल वॉटरचे अनेक प्लांट बंद झाले आहेत, तर दुसरीकडे कुठेही, कधीही, केव्हाही, कसाही व्यवसाय करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसलेला पाणी जारचा व्यवसाय तेजीत आला आहे. मात्र या अनियंत्रित व्यवसायाचे धोके देखील वाढले आहेत.

पाऊचवर बंदी आल्याने मिनरल वॉटरचे प्लांट संकटात

author img

By

Published : Mar 17, 2021, 5:08 PM IST

जालना - प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पाऊचमध्ये पाणी विक्री करण्यास बंदी घातल्यामुळे, मिनरल वॉटरचे अनेक प्लांट बंद झाले आहेत, तर दुसरीकडे कुठेही, कधीही, केव्हाही, कसाही व्यवसाय करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसलेला पाणी जारचा व्यवसाय तेजीत आला आहे. मात्र या अनियंत्रित व्यवसायाचे धोके देखील वाढले आहेत.

मिनरल वॉटर आणि पाणी जार यामधील फरक

मिनरल वॉटरचा प्लांट सुरू करण्यासाठी सुमारे पन्नास लाखांचा खर्च येतो. त्यामध्ये प्रयोगशाळा बॉटलींग मशनरी, आणि त्या अनुषंगाने तेथील स्वच्छता व कर्मचारी तसेच महत्त्वाचा भाग म्हणजे बीआयएस (ब्युरो इंडियन स्टॅंडर्ड) या संस्थेचा परवाना लागतो. त्यामुळे त्यांनी घालून दिलेल्या नियम, अटीनुसारच हा प्लांट उभा करावा लागतो. त्यांच्याकडून 20 लिटर (बॉटल), एक लिटर बॉटल, आणि 200 / 250 एम. एल .चे प्लास्टिक पाऊच या तीन प्रकारच्या सील बंद पाणी विक्री साठी परवाना देण्यात येतो.

पाण्याच्या जारचा व्यावसाय तेजीत

याउलट सध्या सुरू असलेला वीस लिटर आणि 18 लिटर थंड पाण्याच्या जार मधील व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत आहे. या व्यवसायावर कोणाचेही नियंत्रण नाही. शासनाने निर्देश दिले आहेत की, अन्न प्रशासनाने हा परवाना द्यावा मात्र बीआयएसचा परवाना असल्याशिवाय अन्न प्रशासन हा परवाना देऊ शकत नाही. आणि दुसऱ्या प्रकारात भूजल सर्वेक्षण विभागाने पाणी उपसा करण्यासाठी अशा प्लांटला परवानगी द्यावी, परंतु हे प्लांट व्यवसायिक समजायचे का घरगुती समजायचे. त्यांना कोणते नियम लावायचे हेच माहीत नसल्यामुळे भूजल सर्वेक्षण देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. किंवा समबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा व्यवसायावर नियंत्रण ठेवावे त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत तर शहरी भागात नगरपालिका याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात, मात्र हा व्यवसाय एवढा फोफावला आहे की गल्ली बोळामध्ये आणि शेतामध्ये देखील हे प्लांट सुरू झाले आहेत.

अल्प भांडवलात सुरू होतो व्यावसाय

वाहन व्यवस्था सोडली तर दोन लाखांमध्ये हा प्लांट सुरू होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना विशेष करून शेतकऱ्यांनी हा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. कारण शेतामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे, विज आहे, काम करणारे ते स्वतः आणि शेतीत काम करणारे मजूर देखील या कामाला वापरता येतात. आहे त्या पत्र्याच्या शेडमध्येच काम सुरू होते, त्यामुळे अतिरिक्त खर्च कोणताही नाही, म्हणून अशा प्रकारचे उद्योग मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी दिसतात.

पाऊचवर बंदी आल्याने मिनरल वॉटरचे प्लांट संकटात

पाऊच बंदीमुळे अनेक प्लांट बंद

ग्रामीण भागातील मिनरल वॉटरचे प्लांट शहरी भागातील प्लांट्शी स्पर्धा करू शकत नाहीत, कारण मालाच्या वाहतुकीवरच जास्त खर्च होतो. त्यामुळे मागील वर्षांपर्यंत ग्रामीण भागात बॉटलींग साठी जरी परवाना असला, तरी असे प्लांट चालक फक्त पाऊच उत्पादन करायचे. आणि पाऊच विकायचे त्यामधून चांगले उत्पन्न होते. मात्र पाऊच बंद झाले आणि मिनरल वॉटरचे ग्रामीण भागातील प्लांट देखील बंद व्हायला सुरुवात झाली.

पाण्याच्या जारचे धोके

सध्या सर्वत्र 18 लिटरचे थंड पाण्याचे जार वीस ते तीस रुपयात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे घरोघरी आणि शासकीय कार्यालयांमध्ये याचा मोठा वापर सुरू आहे. पाण्यामध्ये कोणते गुणधर्म असायला हवेत आणि कोणते नको याविषयी कुठलीही चाचणी या पाण्याची होत नाही. केवळ फिल्टरचे आणि थंड पाणी आहे या दोन शब्दावरच हा व्यवसाय सुरू आहे. लग्नकार्यात तर मोठ्या प्रमाणात याची मागणी वाढते, मात्र एखाद्याच्या मनात वाईट हेतू आला तर अशा कार्यात विघ्न आणयलाही वेळ लागणार नाही आणि असे झाले तर याची जबाबदारी कोणावर? हा मोठा प्रश्न आहे. याउलट सीलबंद पाण्याचे आहे या सिलबंद पाण्याची सूक्ष्मजैविक चाचणी केली जाते, त्यामुळे काय कमी जास्त आहे याची तपासणी प्लांटमध्ये असलेल्या प्रयोगशाळेत केली जाते आणि मगच हे पाणी विक्रीसाठी बाहेर येते, आणि याची जबाबदारी त्या उत्पादकावर निश्चित करता येते, त्यामुळे उत्पादकावर एक प्रकारचे नियंत्रण असते. तूर्तास सूक्ष्मजैविक चाचणी करण्याची प्रयोगशाळा मराठवाड्यात नाही त्यामुळे अन्न प्रशासनाने जर काही नमुने तपासणीसाठी घेतले तर पुणे येथील प्रयोगशाळेत ते पाठविले जातात. अन्न प्रशासन परवानाधारक मिनरल वॉटरप्लांटच्या दरवर्षी तपासण्या करतात. मागील वर्षी एकही तक्रार आली नाही, परंतु स्वतःहून अन्न औषध प्रशासनाने सहा ठिकाणी या तपासण्या केल्या होत्या.

जालना जिल्ह्यात मिनरल वॉटरचे 12 प्लांट

मिनरल वाटर प्लांट चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड) या संस्थेने परवाना दिलेले बारा मिनरल वॉटर प्लांट जालना जिल्ह्यामध्ये आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊच विक्रीवर बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील चार प्लांट चालकांनी आपले प्लांट बंद केले आहेत. तर दोन प्लांट चालकांनी आपला परवाना रद्द करून घेतला आहे. सध्या जेमिनी इंडस्ट्रीज रेल्वे स्टेशन रोड जालना, कस्तुरी एक्वा चौधरी नगर जालना, तेजस्वी इंडस्ट्रीज औद्योगिक वसाहत, रॉयल इंडस्ट्रीज परतुर, यशोदीप इंडस्ट्रीज मंठा, शिखा ॲग्रो इंडस्ट्रीज रामनगर, गोदावरी ॲग्रो इंडस्ट्री शहागड याठिकाणी प्लांट सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.