ETV Bharat / state

बाहेरगावी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी; ६ लाखांचा मुद्देमाल लंपास - house

अंबड शहरातील नविन मोंढा भागात असलेल्या होलसेल किराणा व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. लग्न कार्यानिमित्ताने व्यापारी दाम्पत्य बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी 'डाव' साधला.

बाहेरगावी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी; ६ लाखांचा मुद्देमाल लंपास
author img

By

Published : Jun 13, 2019, 11:29 PM IST

जालना - अंबड शहरातील नवीन मोंढा भागात असलेल्या होलसेल किराणा व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. लग्न कार्यानिमित्ताने व्यापारी दाम्पत्य बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी 'डाव' साधला आहे.

बाहेरगावी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी; ६ लाखांचा मुद्देमाल लंपास

अंबड शहरातील नविन मोंढा भागांमध्ये सोहनलाल लालचंद मराठी यांचे गोपाल ट्रेडिंग या नावाने दुकान आहे. महत्त्वाचे म्हणजे दुकान आणि त्यांचे घर एकत्रित आहे. खालच्या मजल्यावर होलसेल किराणा दुकान आहे. तर वरच्या मजल्यावर ते स्वतः आपली पत्नी गंगाबाई राठी यांच्यासोबत राहतात. ते आपल्या पत्नीसोबत ११ जून रोजी लग्न कार्यानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागून घरात प्रवेश केला.

घरात ठेवलेले २ लाख ७० हजार रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Intro:अंबड शहरात व्यापाराच्या घरी चोरी सहा लाखाचा ऐवज लंपास

अंबड शहरात नविन मोंढा भागात असलेल्या होलसेल किराणा व्यापार्‍याच्या घरी दि.12 च्यारात्री चोरी झाली. यामध्ये रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण सहा लाख रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.
अंबड शहरातील नविन मोंढा भागांमध्ये सोहनलाल लालचंद मराठी यांचे गोपाल ट्रेडिंग या नावाने खालच्या मजल्यावर होलसेल किराणा दुकान आहे ,तर समजल्यावर स्वतः सोहनलाल आणि त्यांच्या पत्नी गंगाबाई राठी हे दोघेच राहतात. दिनांक अकरा रोजी लग्न कार्यानिमित्त हे दाम्पत्य बाहेरगावी गेले होते. याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागून घरात प्रवेश केला ,आणि शयन कक्षाच्या दाराचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश केला. तिथे ठेवलेल्या जर्मनच्या डब्यातील दोन लाख 70 हजार रुपये नगदी, चार तोळे सोन्याच्या एक लाख वीस हजार रुपयांच्या बांगड्या ,दोन तोळे सोन्याच्या साठ हजार रुपयांच्या अंगठ्या, आणि पाच तोळे सोन्याचे नेकलेस, असा एकूण सुमारे सहा लाख रुपयांचा माल लंपास केला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप पर्यंत चोरट्यांचा सुगावा लागला नाही.Body:सोबत व्हिजवलConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.