ETV Bharat / state

परतूरच्या व्यापार्‍याने दिली जालन्याच्या व्यापाऱ्याची सुपारी; नेम चुकल्याने अनर्थ टळला - jalna crime news

31 ऑक्टोबरला पहाटे व्यापारी विमलराज सिंघवी हे सिंदखेडराजा रोडवरील वनविभागाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सिंदखेडराजाकडून येणाऱ्या वाहनातुन एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्यामुळे गोळी सिंघवी यांच्या डोक्याला घासून गेली होती.

परतूरच्या व्यापार्‍याने दिली जालन्याच्या व्यापाऱ्याची सुपारी
author img

By

Published : Nov 21, 2019, 8:58 PM IST

जालना - जालन्याचे व्यापारी विमलराज संपतराज सिंघवी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परतूर येथील व्यापारी राजेश माणकचंद नहार याने विमलराज यांना जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

परतूरच्या व्यापार्‍याने दिली जालन्याच्या व्यापाऱ्याची सुपारी

31 ऑक्टोबरला पहाटे व्यापारी विमलराज सिंघवी हे सिंदखेडराजा रोडवरील वनविभागाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सिंदखेडराजाकडून येणाऱ्या वाहनातून एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्यामुळे गोळी सिंघवी यांच्या डोक्याला घासून गेली. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सोमनाथ उर्फ पप्पू गायकवाड (रा.शिवनगर जालना) याला ताब्यात घेतले होते. घटनेची अधिक चौकशी केली असता, आरोपीने व्यापारी राजेश माणकचंद नहार याच्या सांगण्यावरून आपल्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दत्ता जाधव (रा. आंबा) आणि जालिंदर सोलाट (रा.मांडवा), अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - गुटखा माफियांवर जालना पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी व्यापाऱ्यासह चैघांनाही ताब्यात घेतले असून आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या आणि एक गावठी पिस्तुल, असा एकूण 8 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी ही कारवाई केली.

Intro:जालनातील व्यापारी विमलराज संपतराज सिंघवी हे दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोजी जालना शहरालगत असलेल्या सिंदखेड राजा रोडवरील वनविभागाच्या परिसरात पहाटे फिरण्यासाठी गेले होते .याच वेळी सिंदखेड राजा कडून येणाऱ्या वाहनातुन एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली होती ,मात्र नेम चुकल्यामुळे ही गोळी सिंघवी यांच्या डोक्याला लागून गेली, आणि जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची जास्त चर्चा झाली नाही, मात्र पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. आणि स्वतः पोलीस अधीक्षक यस. चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह सह अनेक अधिकाऱ्यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास यंत्रणा कामाला लागली.

Body:या गुन्ह्यांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक गौर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सोमीनाथ उर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड रा करोडी ता. जि. औरंगाबाद .हल्ली मुक्काम शिवनगर जालना, याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केला आहे. गायकवाड याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक माहिती विचारल्यानंतर त्याने हा गुन्हा दत्ता बाबासाहेब जाधव राहणार, आंबा, तालुका परतुर, जिल्हा जालना. जालिंदर सर्जेराव सोलाट मांडवा. ता. बदनापूर यांच्यासह केले असल्याची कबुली दिली.
या कबुली नंतर हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून आणि का केला? याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच सदरील गुन्हा परतूर येथील व्यापारी राजेश माणकचंद नहार यांच्या सांगण्यावरून केल्याची कबूल दिली.तसेच या गुन्ह्यांमध्ये वापरलेली एक बेलोरो कंपनीची जीप ,एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार, आणि एक गावठी पिस्टल ,असा एकूण आठ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून चारही जणांना अटक केली आहे.
(मोजोवर घेतलेले बाईट उडाले आहेत, म्हणून रिपोर्टर अँपवरून पाठवले आहेत)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.