जालना Maratha Protesters Attacked: सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा मुद्दा तापला असून मराठा आंदोलक (Attack on Tehsildar car in Jalna) आता आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत. कोणत्याही राजकीय व्यक्तीला गावात तथा शहरात येऊ देणार नाही, (Tehsildar car vandalized in Jalna) अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. नेत्यांना गावबंदी केल्यानंतर आता मराठा बांधवांचं पुढचं लक्ष्य शासकीय अधिकारी आहेत. (Maratha Protest in Jalna)
'हाय व्होल्टेज' लाईनच्या टावरवर चढून आंदोलन: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकाळी चार वाजेपासून बाजी उमरज या गावात मराठा आंदोलक हाय व्होल्टेज लाईनच्या टावरवर चढून आंदोलन करत होते. आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्याने संतापलेल्या आंदोलकांनी तहसीलदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालना शहरात उमटले आहे. मराठा समाजबांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी लवकर भेट न दिल्याने संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. जालना मंठा रोडवरील बाजी उमरद फाट्यावर ही घटना घडली आहे.
तहसीलदारांच्या गाडीचे मोठे नुकसान: मराठा आंदोलकांकडून जालना मंठा रोडवर 'रस्ता रोको' सुरू होते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून तहसीलदार छाया पवार देखील घटनास्थळी आहेत. आंदोलकांनी केलेल्या या दगडफेकीमध्ये कुठलाही अधिकारी जखमी झाला नाही; मात्र तहसीलदारांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून ही गाडी तहसीलदारांच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहे. त्या पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे. या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मराठा आंदोलनाचा काही ठिकाणी उद्रेक होणे स्वभाविक: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बारामती मतदारसंघात सहन करावा लागला. यामुळं त्यांना कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाचा प्रश्न थोडा चिघळला आहे. संवादातून मार्ग निघत असतो. काही ठिकाणी उद्रेक होणे स्वभाविक आहे. त्यातूनच अजित पवारांची घटना घडली आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा: