जालना Manoj Jarange Patil Ultimatum - मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उपोषण करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे यांच्यामुळे राजकीय नेत्यांसह राज्य सरकार बॅकफुटवर आलयं. आंदोलक मनोज जारंगे यांनी राज्य सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. चार दिवसात निर्णय घेतला नाही तर, पाणीही सोडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलय.
मनोज जारंगे यांनी १९ ऑगस्ट रोजी त्यांनी मराठा आरक्षणाकरिता अंतरवली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केलं. तेव्हा, त्या आंदोलनाची फारशी दखल घेण्यात आली नाही. मात्र, एका 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. त्यानंतर मनोज जारंगे यांचे आंदोलन हा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या आंदोलनामुळे शिंदे फडणवीस सरकारसमोर मोठे आव्हान आहे.
कोण आहेत मनोज जारंगे? जारंगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी या छोट्याशा गावातील रहिवाशी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. मातोरी येथे काही वर्षे घालवल्यानंतर जारंगे यांनी काहीकाळ जालना जिल्ह्यातील शहागड येथील एका हॉटेलमध्ये काम केले. त्यांनी अंबड येथील साखर कारखान्यात नोकरी केली. त्यांची पत्नी आणि मुले शहागड येथे राहतात. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात जारंगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.
वैचारिक मतभेदामुळे काँग्रेस सोडली- जारंगे हे काँग्रेस पक्षाचे काम करत असतानाच 2000 च्या सुमारास युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मात्र, राजकीय मुद्द्यांवरून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मराठा समाजाच्या संघटनेसाठी काम करण्यास सुरुवात केली.मनोज जारंगे यांनी 2011 च्या सुमारास शिवबा संघटना' संघटना स्थापन केली. त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आंदोलन केले. 2013 मध्ये त्यांनी जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले. 2016 मध्ये राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा आंदोलनातही त्यांनी सक्रिय भूमिका बजाविली. जालना जिल्ह्यातील साष्टी पिंपळगाव येथे जारंगे यांनी सुमारे ९० दिवस आंदोलन केले. मनोज जरंगे यांचे नातेवाईक अनिल महाराज जरंगे म्हणाले, मनोज यांचे यांचे वडील रावसाहेब, आई प्रभाभाई जरंगे, मोठे भाऊ जगन्नाथ आणि काकासाहेब हे देखील मातोरी येथे राहतात. मनोज यांनी जालना जिल्ह्यातील शहागडजवळ काही जमीन खरेदी केली. परंतु त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न नेहमीच कमी राहिले आहे.
हेही वाचा-