ETV Bharat / state

लसीकरणाची वर्षपूर्ती, ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण - आरोग्य मंत्री राजेश टोपे - लता मंगेशकर तब्येत राजेश टोपे प्रतिक्रिया

लसीकरणाला एक वर्ष पूर्ण ( Rajesh tope talk on vaccination one year complete ) झाले असून, राज्यात लसीकरणासाठी पात्र 90 टक्के नागरिकांना पहिला तर, 62 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे ( Maharashtra health minister rajesh tope ) यांनी दिली.

rajesh tope talk on vaccination one year
राजे टोपे प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 16, 2022, 3:58 PM IST

जालना - लसीकरणाला एक वर्ष पूर्ण ( Rajesh tope talk on vaccination one year complete ) झाले असून, राज्यात लसीकरणासाठी पात्र 90 टक्के नागरिकांना पहिला तर, 62 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे ( Maharashtra health minister rajesh tope ) यांनी दिली.

माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

हेही वाचा - Rajesh Tope Jalna : केंद्राने सर्व राज्यांना समान नियम लावणे गरजेचे - राजेश टोपे

शाळांबाबत पुनर्विचार करण्यात येईल

राज्यातल्या शाळा ( Health minister Rajesh tope talk on schools ) बंद करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेने शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांचा आढावा घेवून यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले.

लता दिदींची प्रकृती सध्या स्थिर

लता मंगशेकर यांच्या ( Rajesh tope talk on lata Mangeshkar health ) तब्येतीबाबत हाॅस्पिटल व्यवस्थापकाशी चर्चा केली. लता दिदींची तब्येत सध्या स्थिर असून, हाॅस्पिटलचे प्रसिद्धी प्रमुख यावर माहिती देतील, असे टोपे म्हणाले.

लसीकरणाला एक वर्ष पूर्ण

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या जरी मोठी असली तरी, मृत्युदर मात्र खूप कमी आहे. ही सर्व उपलब्धी लसीकरणाची आहे. सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे म्हणाले. आज लसीकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे, टार्गेट पूर्ण करण्याची नम्रतापूर्वक विनंतीही टोपे यांनी महाराष्ट्र्राच्या जनतेला केली आहे. आज राज्यात एकूण बाधित संख्या ही जवळपास 2 लाख 65 हजार इतकी आहे. त्यापैकी 86 ते 87 टक्के लोक हे होम गृह विलगीकरणात आहेत. त्यांना तापासारखी माईल्ड स्वरुपाची लक्षणे आहेत. त्या अनुषंगाने त्यांना संध्या हॉस्पिटलाईज करण्याची आवश्यकता नाही. काळानुसार लसीकरण करून घेण्याची गरज असल्याचे टोपे ( Maharashtra health minister rajesh tope ) म्हणाले.

केंद्राने राज्याला लसीचा पुरवठा कमी केला, असे कुठेही बोललो नाही

केंद्राच्या आरोग्य विभागाच्या वतीने काल लसीच्या पुरवठ्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर बोलताना राजेश टोपे यांनी, आपण लसीकरणाच्या साठ्याबाबत आरोग्य विभागाचे सचिव आणि मुख्य सचिव यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, राज्याला एकूण 60 लाख 15 ते 18 वयोगटांतील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनची गरज आहे. त्याचबरोबर फ्रंटलाईन आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना तिसरी लस म्हणून जो बुस्टर डोस वापरायचा आहे त्याबाबत आपण महिनाभर पुरेल याची तयारी करतो. यासाठी सुद्धा जी लस हवी आहे त्याबाबत आपण केंद्राला कळवले आहे. राज्याला 50 लाख कोविशिल्ड आणि 40 लाख कॉव्हॅक्सिन कमी पडत असल्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने आपण रीतसर मागणी केलेली आहे. केंद्राने राज्याला लसीचा पुरवठा कुठल्याही प्रकारे कमी केला आहे, असे कुठेही बोललो नसल्याचे आरोग्य मत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, राज्यात लसीकरणात आपण 15 ते 18 या वयोगटाला आपण प्राधान्य क्रमाने घेतले आहे. त्यासाठी राज्यात आपण दरोज 8 लाख लसीकरण करत आहोत. त्या दृष्टिकोनातूनही राज्याकडून केंद्राकडे मागणी केल्या जात असल्याचेही आरोग्य मत्री राजेश टोपे म्हणाले.

जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे

लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याने आपण या बाबत पालकमंत्री आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना केलेल्या आहे. कॅबिनेटमध्येसुद्धा या बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितले आहे. प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने सुद्धा सर्व कर्मचारी पूर्णक्षमतेने, जिद्द, चिकाटी आणि कुठे ही हुरूप कमी न होऊ देता काम करत राहील, अशीच अपेक्षा आपण करत असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा - Jalna fruit seller murder : डबलजीन भागात २५ वर्षीय फळविक्रेत्याची हत्या ; शहरात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.