ETV Bharat / state

जालन्यात लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्यावतीने लेखन आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन - लॉयन्स क्लब इंटरनॅशनल जालना

'कोरोना एक महामारी' या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

painting and writing competition
जालन्यात लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्यावतीने लेखन आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन
author img

By

Published : Apr 13, 2020, 8:48 AM IST

जालना - दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत जाणारा प्रभाव लक्षात घेता जनता अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात घरी बसण्यास तयार नाही. त्यामुळे जनतेला घरीच बसून त्यांच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि त्यांच्या अंगात असलेले कलागुण बाहेर काढण्यासाठी लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्यावतीने लेखन आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पुरुषोत्तम जयपुरिया, इंटरनॅशनल क्लबचे जीएसटी प्रमुख
'कोरोना एक महामारी' या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला ब्रश 'पेन्सिल' पेन' अशा कोणत्याही रंग प्रकाराचे बंधन नाही. फक्त वयोगट पाच ते नऊ' नऊ ते बारा' बारा ते सोळा 'आणि 16 च्या पुढील असे चार वयोगट करण्यात आले आहेत. कोणत्याही कागदावर हे चित्र काढून 94 222 10 386 आणि 97 67 0 74 55 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप करायचे आहे, यासाठी कोणताही खर्च नाही. यामधून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट छायाचित्राला बक्षीसही मिळणार आहे. त्याच सोबत जे कोणी चित्रकार सहभागी होतील त्यांना ही प्रमाणपत्रही दिल्या जाणार आहे. सोबतच साहित्यक्षेत्रातील आवड असणार्‍यांनी आपली कविता, चरित्रलेखन, आत्मलेखन असा कोणताही साहित्यप्रकार याचा 25 ओळी पेक्षा जास्त समावेश नसावा. असे हिंदी आणि मराठीतील हे साहित्य 86 98 33 18 33 आणि 94 22 77 322 या नंबरवर व्हाट्सअप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लायन्स क्लबच्या वतीने 26 मार्चला सुरू झालेली ही स्पर्धा 15 एप्रिलला संपणार होती. मात्र, लॉकडाऊनचा काळ वाढवल्यामुळे या स्पर्धेचाही कार्यकाल वाढविण्यात आला असल्याची माहिती इंटरनॅशनल क्लबचे जीएसटी प्रमुख पुरुषोत्तम जयपुरिया यांनी दिली. या स्पर्धांमुळे जनता घरी बसून विरंगुळा ही करेल आणि त्यांच्या कलागुणांना वावही देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.