ETV Bharat / state

रहाटपाळण्यासह जत्रेतील अन्य खेळांना परवानगी द्या, लहूशक्ती संघटनेची मागणी

author img

By

Published : Aug 25, 2020, 2:53 PM IST

एक रहाटपाळणा दहा लोकांची उपजीविका भागवतो. मात्र, कोरोनामुळे हे सर्व बंद असल्याने अनेक परिवार उपासमार सोसत आहेत. त्यामुळे, परवानगी मिळाल्यानंतर सोशल डिस्टंन्स पाळत व्यवसाय करण्यात येईल या हमीसह राष्ट्रीय लहूशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

रहाटपाळण्यासह जत्रेतील अन्य खेळांना परवानगीची मागणी

जालना - कोरोनाच्या महामारीतून आता जनजीवन सुरळीत सुरू होत आहे आणि अनेक उद्योग व्यवसायांना परवानगीही मिळाली आहे. याच धर्तीवर रहाट पाळणे आणि जत्रेतील मुलांसाठी छोट्या खेळण्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय लहूशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून रहाट पाळणे, जंपिंग जंपिंग, गोल राहट पाळणे अशा विविध प्रकारच्या खेळण्याचे व्यवसाय बंद पडले आहेत. सध्या विविध सणांचे दिवस आहेत. त्यामुळे मंदिराच्या परिसरांमध्ये अशा प्रकारच्या खेळण्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे या खेळण्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी अशी, मागणी करण्यात आली आहे. या व्यवसायिकांच्या हाताला गेल्या चार महिन्यांपासून काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक रहाटपाळणा दहा लोकांची उपजीविका भागवतो. मात्र, कोरोनामुळे हे सर्व बंद असल्याने अनेक परिवार उपासमार सोसत आहेत. त्यामुळे, परवानगी मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळत व्यवसाय करण्यात येईल, अशी हमीदेखील या निवेदनात देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्व व्यवसाय सुरळीत सुरू झाले आहेत. एसटीदेखील आता धावू लागली आहे. त्यामुळे या व्यवसायाला बंदी घालून काहीच साध्य होणार नाही. उलट गरिबांवर अन्याय केल्यासारखे होईल, असेही या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय लहूशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन लांडगे, दशरथ लांडगे, शेख इरफान, रामदास जाधव, सुरेश शिंदे, गणेश लांडगे आदींनी आपल्या मागण्यांचे हे निवेदन सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले आहे.

हेही वाचा - सामाजिक संस्था व लोकसहभागातून बाजारवाहेगावची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.