जालना - परतुर ते रांजणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे 21 डिसेंबर ते 29 फेब्रुवारी दरम्यान आठवड्यातून तीन दिवस काम सुरू असणार आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार असून, परतूर रेल्वे स्थानकावर दोन्ही प्रवासी रेल्वे सुमारे एक तास थांबवल्या जाणार आहेत.
हेही वाचा - विटा वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याने तीन कामगार ठार, चार जखमी
21 डिसेंबर ते 29 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपासून ते 5 वाजून 50 मिनिटांपर्यंत अडीच तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत धावणाऱ्या काचिगुडा-मनमाड आणि औरंगाबाद -हैदराबाद या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. काचीगुडा ते मनमाड ही पॅसेंजर गाडी परतुर रेल्वे स्थानकावर 66 मिनिटे तर औरंगाबाद-हैदराबाद ही पॅसेंजर गाडी पन्नास मिनिटे रंजणी येथे थांबविण्यात येणार आहे.
बदल झालेले दिवस -
डिसेंबर महिन्यातील दिनांक 21, 24, 26 ,28 ,31, जानेवारी महिन्यातील दिनांक 2, 4, 7, 9, 11, 14, 16, 18 ,21 ,23, 25, 28, 30, फेब्रुवारी महिन्यातील दिनांक 1, 4,6, 8, 11, 13, 15, 18, 20, 22, 25, 27 आणि 29 तारखेपर्यंत हे बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - एकनाथ खडसेंचं ठरलं... म्हणाले लवकरच पक्षांतर!