ETV Bharat / state

जालन्यातून आठ मोटार सायकलींसह चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश

वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या आठ मोटार सायकली चोरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. जालना शहरात मोटार सायकल आणून विकण्याचा प्रयत्न करित असलेल्या एका तरुणाला शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी मंगळवारी रंगेहात पकडून आठ मोटारसायकल जप्त करणयात पोलिसांना यश आले आहे.

जालन्यातून आठ मोटार सायकलींसह चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश
author img

By

Published : Nov 5, 2019, 4:44 PM IST

जालना - वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या आठ मोटार सायकली चोरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. जालना शहरात मोटार सायकल आणून विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका तरुणाला शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी मंगळवारी रंगेहात पकडून आठ मोटारसायकली जप्त केल्या.

हेही वाचा - मुख्यमंत्री हा फक्त आणि फक्त शिवसेनेचाच होणार - संजय राऊत

आरोपी विशाल दुर्योधन इंगळे बार्शीटाकळी तालुक्यातील लिंबी येथील रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास चोरी केलेल्या मोटरसायकल जालन्यात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावल्यानंतर या तरुणाजवळ होंडा शाईन कंपनीची नंबर नसलेली मोटार सायकल सापडली.

पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जालना, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला अशा विविध ठिकाणी चोरी केलेल्या मोटरसायकल विकण्यासाठी आणल्या होत्या. त्यानंतर ज्या ठिकाणी आरोपीने मोटरसायकल ठेवल्या होत्या, त्या रत्नदीप पांडे यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकून आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या मोटर सायकलची बाजारामध्ये किंमत 1 लाख 85 हजार एवढी आहे.

हेही वाचा - तुम्हाला माहीत आहे का? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही बनवू शकतात मुख्यमंत्री

Intro:1 लाख 85 हजाराच्या चोरीच्या आठ मोटारसायकल जप्त
जालना
विविध जिल्ह्यातून चोरी केलेल्या मोटर सायकल जालना शहरात आणून विकण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी या तालुक्यातील रहीवाशी असलेल्या एका तरुणाला शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी आज रंगेहात पकडून त्याच्याकडून आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील लिंबी येथील रहिवासी असलेला तरुण विशाल दुर्योधन इंगळे हा आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास चोरी केलेल्या मोटरसायकल जालन्यात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावल्यानंतर या तरुणा जवळ होंडा शाईन कंपनीची नंबर नसलेली मोटार सायकल सापडली. त्यावेळी त्याच्यावर झडप घालून पोलिसांनी माहिती विचारली असता ,त्याने जालना ,औरंगाबाद, बुलढाणा ,अकोला ,अशा विविध ठिकाणी चोरी केलेल्या मोटरसायकल विकण्यासाठीआणल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जिथे या मोटरसायकल ठेवल्या होत्या त्या रत्नदीप पांडे या इंगळे यांच्या साथीदाराच्या घरी पोलिसांनी धाड टाकून आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या मोटर सायकलची बाजारामध्ये किंमत 1लाख85 हजार एवढी आहे.Body:Sobt fotoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.