ETV Bharat / state

जालन्यात रोज ७ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, पुरेसा पुरवठा - Corona patient oxygen supply

शहरातील २ मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे उत्पादनही केले जाते. ऑक्सिजनची मागणी वाढल्याने या प्लांटची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत सद्यस्थितीमध्ये जालन्याला रोज ७ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे आणि त्यानुसार होणारा पुरवठा देखील पुरेसा आहे.

ऑक्सिजन प्लांट
ऑक्सिजन प्लांट
author img

By

Published : Sep 19, 2020, 4:04 PM IST

जालना - राज्यातील काही जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचा आरोप होत होता. याबाबतीत जालना जिल्ह्यातील स्थिती बरी असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन वितरण होत असून व्यवस्थेवर प्रशासकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

जिल्ह्यात रुग्णांसाठी असलेले खासगी हॉस्पिटल आणि सरकारी रुग्णालयांची मागील आठवड्याची सरासरी काढली तर रोज ७ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. एवढी मागणी पूर्णही केली जात आहे. ऑक्सिजनचे उत्पादन करणारे दोन कारखाने जालना शहरात आहेत. आणि कोरोना रुग्णालयामध्ये लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट उभारल्याने याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

कोरोना रुग्णालयात २० हजार लिटर साठवणूक क्षमता असलेला ऑक्सिजन लिक्विड प्लांट दोन महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे, इथे असलेल्या रुग्णांना सिलिंडरमार्फत ऑक्सिजन न पुरवता थेट टाकीतून जोडणी देण्यात आली आहे. टाकीमध्ये साठा करण्यासाठी लागणारा लिक्विड ऑक्सिजन हा पुणे (चाकण) येथून टँकरद्वारे येतो. उर्वरित शहरातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गॅसच्या स्वरुपात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

तसेच, शहरातील २ मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे उत्पादनही केले जाते. ऑक्सिजनची मागणी वाढल्याने या प्लांटची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत सद्यस्थितीमध्ये जालन्याला रोज ७ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे आणि त्यानुसार होणारा पुरवठा देखील पुरेसा आहे. या सर्व परिस्थितीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आणि औषधी प्रशासनाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकरी हे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा- घाणेवाडी जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे जालनाकर दीड वर्षासाठी चिंतामुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.