ETV Bharat / state

नगराध्यक्षांचे पती टक्केवारी सम्राट; भाजप कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांचा आरोप - भाजप कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके

माजी आमदार तथा विद्यमान नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचे पती कैलास गोरंट्याल हे टक्केवारी सम्राट आहेत. प्रत्येक कामामध्ये त्यांची टक्केवारी ठरलेली आहे. त्यामुळेच जालना नगरपरिषदेमध्ये अवैध कामे वाढली आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शेळके यांनी केला. दरम्यान, कैलास गोरंट्याल यांनी मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रियता खराब करण्यासाठी विरोधक अशा प्रकारचे आरोप करत असल्याचे स्पष्टीकरण या सर्व आरोपांवर दिले आहे.

नगराध्यक्षांचे पती टक्केवारी सम्राट भाजप कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांचा पत्रकार परिषदेत आरोप
author img

By

Published : Aug 17, 2019, 11:02 PM IST

जालना - माजी आमदार तथा विद्यमान नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचे पती कैलास गोरंट्याल हे टक्केवारी सम्राट आहेत. प्रत्येक कामामध्ये त्यांची टक्केवारी ठरलेले आहे. त्यामुळेच जालना नगरपरिषदेमध्ये अवैध कामे वाढली आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शेळके यांनी केला आहे. पालिकेच्या कारभाराची लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेळके यांनी आज (दि.१७) पत्रकार परिषदेत केली.

नगराध्यक्षांचे पती टक्केवारी सम्राट भाजप कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांचा पत्रकार परिषदेत आरोप

शेळके यांनी यासंदर्भात शासनाच्या सर्व तपासणी कार्यालयांना पत्रदेखील पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नगराध्यक्षांच्या नावाखाली येणारा निधी दुसऱ्या कारणांसाठी मनमानी पद्धतीने आणि स्थायी समितीची परवानगी न घेता वापरला जातो. याशिवाय, सन 2018 गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी पालिकेने विसर्जन स्थळी कुठलीही सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे तीन गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगराध्यक्षांना दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पालिकेची जन्म-मृत्यूची नोंद सुरळीत करण्यात यावी. पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात यावे, अशा विविध मागण्या शेळके यांनी यावेळी केल्या.

नगरपालिकेची विविध बँकांमध्ये एकूण 64 खाती असल्याचा धक्कादायक खुलासादेखील शेळके यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विविध लेखाशीर्षांतर्गत प्राप्त निधीसाठी एकच बँक खाते आवश्यक असताना नगराध्यक्षांच्या तोंडी आदेशानुसार अनेक खाती सुरू असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय नळ, घरपट्टी मालमत्ता कर, यांच्या माध्यमातून वसूल झालेली रक्कम नगरपालिकेच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही, त्याचसोबत जमाखर्चाचे अभिलेख बँक खात्यांशी जुळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, कैलास गोरंट्याल यांनी मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रियता खराब करण्यासाठी विरोधक अशा प्रकारचे आरोप करत असल्याचे स्पष्टीकरण या सर्व आरोपांवर दिले आहे.

Intro:जालन्याचे माजी आमदार तथा विद्यमान नगराध्यक्षा सौ संगीता गोरंट्याल यांचे पती कैलास गोरंट्याल हे टक्केवारी सम्राट आहेत. प्रत्येक कामामध्ये त्यांची टक्केवारी ठरलेले आहे. यातूनच जालना नगर परिषदेमध्ये अवैध कामे वाढली आहेत, त्यामुळे पालिकेच्या कारभाराची लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकां मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध मारुतीराव शेळके यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

Body:शेळके यांनी शासनाच्या सर्वच तपासणी कार्यालयांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की ,नगराध्यक्ष या एका शीर्षकाखाली असलेला निधी दुसऱ्या कारणासाठी मनमानी पद्धतीने आणि स्थायी समितीची परवानगी न घेता वापरत आहेत, सन दोन हजार अठराच्या गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी पालिकेने विसर्जन स्थळी कुठलीही सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे तीन गणेशभक्तांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी नगराध्यक्षांना दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. नगरपालिकेने जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे बंधनकारक आहे, परंतु पालिकेची ही व्यवस्था बंद असल्यामुळे नागरिकांना हे प्रमाणपत्र मिळत नाही ,पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र ते हटवणे पेक्षा त्यांना पाठबळ दिले जात आहे. या आणि अन्य नऊ मुद्द्यांकडे शेळके यांनी लक्ष वेधले आहे .त्याच सोबत ई-निविदा मधील भ्रष्टाचार, अध्यक्षांचा मनमानी कारभार ,स्वच्छता विभागातील सावळागोंधळ अशा विविध प्रकारच्या भ्रष्टाचारांच्या तक्रारी त्यांनी लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांकडे केले आहेत .
*****
नगरपालिकेचे विविध बँकांमध्ये 64 खाते

विविध लेखाशिर्ष अंतर्गत प्राप्त निधी साठी एकच बँक खाते आवश्यक असताना नगराध्यक्षांच्या तोंडी आदेशानुसार अनेक खाती सुरू असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे .नगरपालिकेने तब्बल 64 बँक खाते कार्यरत ठेवल्याचे सन 2016 17 च्या वार्षिक लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे. या शिवाय नळ ,घरपट्टी मालमत्ता कर ,यांच्या माध्यमातून वसूल झालेली रक्कम नगरपालिकेच्या खात्यात जमा करण्यात आली नाही, त्याचसोबत जमाखर्चाचे अभिलेखे बँक खात्याशी जुळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.