ETV Bharat / state

Jalna Maratha Protest : लोकांच्या केसाला हात लावला तर..; उद्धव ठाकरेंचा राज्यसरकारला इशारा

Jalna Maratha Protest : लाठीचार्ज प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज अंतरवलीत आंदोलकांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला आहे. लोकांच्या केसाला हात लावला तर..; संपूर्ण महाराष्ट्र अंतरवली सराटी गावात आणेल असं ठाकरे यांनी म्हटलंय.

Jalna Maratha Protest
Jalna Maratha Protest
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:51 PM IST

जालना Jalna Maratha Protest : जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक लाठीमार केला. यात 350 हून अधिक आंदोलक, सुमारे 35 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला. शरद पवार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी जखमी आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली. रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. एका आंदोलकाला उद्धव ठाकरेंना डुप्लिकेट गोळी दाखवत याच गोळ्या आमच्यावर झाडल्याचा आरोप केला.

लोकांच्या केसाला हात लागला तर..; एक फूल, दोन हाप सरकारचं काम शून्य आहे. मात्र तरीदेखील सरकार तुमच्या दारी सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. आम्ही सरकारमध्ये असताना तुम्हाला भेटायचो. आता कोणी नसलो तरी माणूस म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मराठा समाजानं आरक्षणासाठी आंदोलनं केली. आझाद मैदानावरही आंदोलन झालं. त्यावेळीही तेच पोलिस होते, मात्र आंदोलकांवर लाठीमार झाला नाही. हे सरकार क्रूर आहे, या सरकारला याची किंमत चुकवावी लागेल. आता इथल्या जनतेला केसाला जरी धक्का लावला तर, संपूर्ण महाराष्ट्रात अंतरवलीत आणेल असा दम उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारला दिला आहे. तसंच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या" अशी देखील त्यांनी मागणी केली आहे.

भाजपाला बिनशर्त पाठिंबा पण... : केंद्र सरकारनं गणपती उत्सावादरम्यान विशेष अधिवेशन बोलावल्याचं सांगून ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले, "याआधी तुम्ही दिल्ली सेवा विधेयकावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय प्रचंड बहुमतानं फिरवला आहे. मराठा आरक्षणाचाही निर्णय त्याच पद्धतीनं झाला पाहिजे. धनगर, ओबीसी समाजाला न्याय मिळायला हवा. दिल्ली सेवा विधेयकाला आम्ही विरोध केला होता. मात्र, आता आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो, असं म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर देखील निशाना साधला आहे.

हेही वाचा -

Ashok Chavan On Maratha Movement : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण

Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात

Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलन चिघळलं, पाहा सरपंचाने पेटवली नवीकोरी कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.