ETV Bharat / state

जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू; रेल्वेचे पाच सदस्यीय पथक - जालना-खामगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षण

जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण कामाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रारंभ झाला आहे. रेल्वे मंत्रालयाचे 5 सदस्यीय पथक पुढील पाच दिवसांमध्ये या 162 किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण करणार आहे.

जालना
जालना
author img

By

Published : Jan 5, 2021, 5:27 PM IST

जालना - गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण कामाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रारंभ झाला आहे. रेल्वे मंत्रालयाचे 5 सदस्यीय पथक पुढील पाच दिवसांमध्ये या 162 किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण करणार आहे.

जालना

सहा अधिकाऱ्यांचे पथक

  1. सुरेश जैन, उपमुख्य परिचालन प्रबंधक, सर्वेक्षण विभाग मध्य रेल्वे, मुंबई.
  2. रवी गुजराज, मुख्य रहदारी निरीक्षक.
  3. मुकेश लाल, रहदारी निरीक्षक (सर्वेक्षण).
  4. दिनेश बोरसे, वरिष्ठ विभाग अभियंता, (सर्वेक्षण)
  5. अजय खनके, सल्लागार (सर्वेक्षण) हे पथक आजपासून जालना-खामगाव रेल्वेमार्गाची उभारणी करण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

जालना-खामगाव रेल्वे सुरू झाल्यानंतर या रेल्वे दरम्यान किती प्रवासी प्रवास करतील? शेतीमाल किती येईल? किती माल बाहेर जाईल? व्यवसायाच्या दृष्टीने रेल्वेची मालवाहतूक उपयोगात येईल का? या सर्व बाबींचे फायदे-तोटे हे पथक जाणून घेणार आहे. त्यासाठी तीन जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जाणाऱ्या या सहा तहसीलमधील अधिकाऱ्यांसोबत हे पथक बोलणार आहे.

हे आहेत तीन जिल्हे

जालना खामगाव हा रेल्वे मार्ग जालना, जळगाव आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यातून आणि सहा तालुक्यातून जाणार आहे. त्यामध्ये जालना, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, जळगाव, चिखली, आणि खामगाव हे सहा तालुके आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार जालना ते खामगाव दरम्यान 19 स्थानके करण्याचे नियोजित असल्याचेही सांगण्यात आले आहे.

भूसंपादन सोडून 13 हजार कोटींचा खर्च

आज आलेले पथक पाच दिवस सर्व पाहणी करून याचे सर्व अंदाजपत्रक रेल्वे मंत्रालयाला सादर करणार आहे. त्यानुसार सुमारे 13 हजार कोटी रुपये या 162 किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गासाठी अपेक्षित आहे. यांच्या अहवालानंतर रेल्वे मंत्रालयाने या कामाला मंजुरी दिली आणि आर्थिक तरतूद केली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये भूसंपादन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जातो आणि त्याचा खर्च हा वेगळा असणार आहे. त्या वेळच्या परिस्थितीनुसार तो ठरविला जातो. त्यामुळे आजच भूसंपादनाविषयी काहीच बोलता येणार नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासदार रावसाहेब दानवेंनी केला होता पाठपुरावा

सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाचे प्रमुख सुरेश जैन यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच त्यांनी या सर्वेक्षणासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता, त्यामुळेच या सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजीव मित्तल आणि मुनोत शर्मा यांनी आपल्याला सर्वेक्षण करण्यासाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.