जालना - पोलीस प्रशासनात गेल्या आठ दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे जालना जिल्हा चांगला ढवळून निघाला आहे. आपली प्रतिमा उंचावण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत असतानाच अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भावना ही पोलिसांचे खच्चीकरण होत असल्याची आहे.
संबंधित बातमी -पोलिसांची भाजपच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान याप्रकरणी अजून या कर्मचाऱ्यांना आदेश मिळालेले नाहीत. परंतु यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम यांना विचारणा केली असता त्यांनी अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे सांगितले. तसेच अशा महामारीमध्ये दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव हॉस्पिटलमध्ये जमणे ही चुकीची बाब आहे आणि हे हॉस्पिटल कोविड रुग्णालय असल्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जीवाला देखील धोका होता आणि अशा परिस्थितीमध्ये जमावाला काबूत करण्यासाठी ही कारवाई अनावधानाने झालेली आहे. परंतु पोलीस अधीक्षक जर निलंबित करीत असतील तर पोलिसांनी काम करावे कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित बातमी - 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा.. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गवळी समाज आक्रमक
संबंधित बातमी - ..त्यांनी आयसीयूपर्यंत दंगा केला होता; म्हणून ती कारवाई, जालन्याच्या व्हायरल व्हिडिओवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया