ETV Bharat / state

अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावरील भगवा राहणार की जाणार, जालन्याच्या राजकारणात अनिश्चितता

अर्जन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक होते. पण, युती झाल्याने त्यांची ही इच्छा अर्धवट राहण्याची शक्यता आहे.

अर्जुन खोतकरांचा बंगला
author img

By

Published : Feb 26, 2019, 12:22 PM IST

जालना - पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी सध्या जालना जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकरांना उमेदवारी हवी होती. पण, ही जागा भाजपला गेल्यामुळे खोतकर नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खोतकरांच्या दर्शना नावाच्या बंगल्यावर भगवा ध्वज फडकत असतो. पण, आगामी काळात हा ध्वज असाच फडकत राहील की त्याजागी दुसरा झेंडा येईल याबद्दल अजून अनिश्चितता आहे.

अर्जुन खोतकर पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मराठा बिल्डिंगमध्ये राहत होते. हळूहळू त्यांचा व्याप वाढत गेला आणि त्यांनी जुन्या जालन्यातील भाग्यनगर येथे आलीशान बंगला बांधला. या बंगल्यावर फडकत असलेला भगवा ध्वज हे सर्वांचे आकर्षण राहिलेला आहे. त्याचसोबत वारकरी संप्रदायाचे दैवत असलेला पांडुरंगदेखील बंगल्यात प्रवेश केल्याबरोबर आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. मात्र, आता त्यांच्या बंगल्यावरील भगव्या ध्वजाचा रंग आता फिकट झाला आहे. त्यामुळे हा ध्वज बदलून तिथे परत भगवाच लागेल, की कुठला वेगळा ध्वज पहायला मिळेल याबद्दल लोकात उत्सुकता आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात खोतकरांनी लढण्याची तयारी केली होती. पण, ऐनवेळी युती झाल्याने त्यांची ही इच्छा अपूर्ण राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची नाराजी उघड बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे या पेचावर निर्णय देत नाहीत. तसेच, काँग्रेसमध्ये प्रवेश करावा तर जिल्हा काँग्रेसमधून खोतकरांना घेण्यास विरोध होत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे खोतकरांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत. ते खोतकरांच्या प्रवेशाला आडकाठी आणत आहेत, असे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

undefined

जालना लोकसभा मतदारसंघात आयुष्मान भारतचे कार्डवाटप करण्याचा घाट रावसाहेब दानवे यांनी घातला आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदाराला बोलावणे आवश्यक असते. त्यामुळे खोतकरांना बोलावणे क्रमप्राप्त आहे. पण, खोतकर कार्यक्रमाला जातील याची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला कार्यक्रमाला आणण्याची योजना आखली जात आहे. जेणेकरून खोतकरांना येणे आवश्यक होईल. आता दानवेंची ही खेळी यशस्वी होणार का आणि खोतकर याला काय प्रतिसाद देतात यावर जालन्याचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

Intro:शिवसेनेचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांच्या "दर्शना" बंगल्यावर फडकत असलेल्या भगव्या ध्वजाचा रंग फिकट झाला आहे. त्यामुळे येथे आता ध्वज जाऊन झेंडा फडकतो की काय? या प्रश्नाचे उत्तराकडे जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात खासदार दानवे घेत असलेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या कार्ड वाटपाचा निमित्त्याने होणाऱ्या राजकीय कुरघोडी मध्ये दर्शनावर ध्वज फडकेल का झेंडा? याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Body:अर्जुन खोतकर पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मराठा बिल्डिंग येथे राहत होते. हळूहळू त्यांचा व्याप वाढत गेला आणि एका मंत्रिपदाचा कार्यकाल या मराठा बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर जुना जालन्यातील भाग्यनगर येथे आलीशान बंगला बांधला. या बंगल्यावर फडकत असलेला भगवा ध्वज हे सर्वांचे आकर्षण राहिलेला आहे .त्याचसोबत वारकरी संप्रदायाचे दैवत असलेला पांडुरंग देखील बंगल्यात प्रवेश केल्याबरोबर आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीपासून शिवसेनेचा फडकत असणाऱ्या या भगव्या ध्वजाचा रंग मात्र आता फिकट झाला आहे .आणिशिवसेनेमध्ये भगव्याला झेंडा न म्हणता ध्वज हा शब्द खासकरून वापरला जातो. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला झेंडा म्हणूनच संबोधले जाते. त्यामुळे बंगल्यावर फडकत असणारा हा ध्वज जाऊन तिथे कोणता झेंडा फडकेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

Conclusion:भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांनी शड्डूऊ ठोकून आखाड्यात उतरण्याचा निर्णय हा यापूर्वी अनेक वेळा जाहीर केला. साम-दाम-दंड आणि तसेच राजकीय भाषेत मैत्रीपूर्ण देखील निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले .मात्र भाजप-सेनेची युती झाल्याने त्यांचे हे संकेत अवघड जागेचे दुखणे होऊन बसले. तिकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष निर्णय द्यायला तयार नाहीत आणि इकडे काँग्रेसमध्ये येऊ देण्यासाठी स्थानिक नेतृत्व तयार नाही. सध्य परिस्थितीत जालना जिल्ह्यातील काँग्रेसचा कारभार हा नवीन नवरी प्रमाणे आहे. महिनाभरापूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना जिल्हाध्यक्षपदावरून कमी करून त्यावेळेस चे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना जिल्हाध्यक्ष केले. जिल्हाध्यक्ष कोणीही झाले तरी त्याच्यावर जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा चांगलाच प्रभाव आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे ही श्री गोरंट्याल यांचे चांगले वजन असल्यामुळे त्यांचा शब्द खाली जात नाही .अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने जालन्याचे विधानसभा उमेदवार म्हणून कैलास गोरंट्याल यांचे नाव जाहीर केले आहे. आणि कैलास गोरंट्याल आणि विद्यमान मंत्री अर्जुन खोतकर हे महाविद्यालय जीवनापासून एक दुसऱ्यांचे चांगले स्पर्धक आहेत. महाविद्यालयात सुद्धा यांनी आमनेसामने निवडणुका लढविल्या होत्या. त्यानंतर राजकारणातही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचा पराभव केलेला आहे. आणि खोतकर यांनीही गोरंट्याल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे दोघेही हाडवैरी असल्यामुळे खोतकरांना काँग्रेसमध्ये येऊ द्यायचे नाही हा हट्ट गोरंट्याल यांनी चव्हाण यांच्याकडे धरलेला आहे. एवढेच नव्हे तर गोरंट्याल यांनी जाहीरपणे तसे बोलूनही दाखविले आहे. आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख हे नवीनच जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे गोरंट्याल यांना विचारल्याशिवाय ते देखील आपले मत व्यक्त करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये नामदार खोतकर यांची चांगलीच गोची झाली आहे.
दरम्यान या प्रकरणांमध्ये अर्जुन खोतकर यांना नमवून लोकसभेच्या निवडणुक रिंगणातून माघार घ्यायला लावण्यासाठी खासदार दानवे यांनी आणखी एक चाल खेळली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील आयुष्यमान भारत योजनेचे कार्डवाटप जालना वगळता इतर सर्व मतदारसंघात पूर्ण झाले आहेत. मात्र राज शिष्टाचारानुसार एखाद्या विधानसभा मतदारसंघात जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या मतदार संघाच्या आमदाराला बोलावणे क्रमप्राप्त आहे. या कार्यक्रमाला विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराला बोलावणे अगत्याचे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार खोतकर त्यांच्या व्यासपीठावर जातील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हा कार्यक्रम घेण्यासाठी खासदार दानवे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला आणण्यासाठी संपर्कात आहेत. जेणेकरून वरिष्ठ नेता आला म्हणजे नामदार खोतकर यांना देखील व्यासपीठावर यावे लागेल आणि प्रकरण शांत झाले असे खासदार दानवे यांना भासवून मतभेद सम्प्ले आहेत,आणि खोतकर त्यांच्या सोबत आहेत असे दाखवता येईल .त्याच सोबत आयुष्यमान भारत योजनेचे कार्डवाटप करणेदेखील आता खासदार दानवे साठी महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. कारण या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी खासदार दानवे यांना .आहे पुढील आठवड्यात हा कार्यक्रम होण्याची दाट शक्यता असून कोण कोणाला नमवितो हे लवकरच कळणार आहे आणि या कार्यक्रमाच्या नंतरच "दर्शना "वर ध्वज फडकणार का झेंडा याचा निर्णय होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.