जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर करण्याबरोबरच रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद व बुलडाणा जिल्ह्यातून जाणे-येणे करणाऱ्या विविध विभागांचे प्रमुख असलेल्या 21 अधिकाऱ्यांना मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बाजावल्या आहेत. जालना जिल्हा परिषदेतील सहा अधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी, नगर प्रशासन, जिल्हा जलसंधारण, महसूल विभाग आदी विभागातील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
येत्या तीन दिवसात नोटीसीचा खुलासा समक्ष सादर करावा, नाहीतर आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटीसमध्ये जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिला आहे.
हे आहेत अधिकारी
- 1 वैभव कुलकर्णी , जिल्हा नियोजन अधिकारी
- 2 पुराणीक, लेखाधिकारी रोजगार हमी योजना जि प जालना
- 3 चंद्रकांत पाटील, उपसंचालक स्थानिक लेखा निधी
- 4 राहुल सूर्यवंशी, जिल्हा प्रकल्प अधिकारी नगर प्रशासन विभाग
- 5 प्रशांत पडघन, तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय जालना
- 6 गावंडे, जिल्हा हिवताप अधिकारी
- 7 चांडक, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग
- 8 गिरवालसिंग, जिल्हा जलसंधारण अधिकारी
- 9 कोकाटे, उपविभागीय कृषी अधिकारी
- 10 श्रीमती खरात, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र
- 11 काळे, सहाय्यक परिवहन अधिकारी
- 12 कोठाले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
- 13 हुमने, अधीक्षक अभियंता महावितरण
- 14 विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि .प. जालना
- 15 डाकोरे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा जि. प. जालना
- 16 कल्पना क्षीरसागर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जालना
- 17 दातखीळ, शिक्षणाधिकारी जि. प.
- 18 गुट्टे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि. प. जालना
- 19 उत्तम चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि. प. जालना
- 20 संगीता लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जालना
- 21 रणदिवे ,जिल्हा कृषी विकास अधिकारी,जि. प.जालना
या 21 वरिष्ठ अधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे.