जालना - जिल्ह्यातून आतापर्यंत मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशला श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती. त्यानंतर उद्यादेखील बिहारला जाणारी रेल्वे सायंकाळी सहा वाजता सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बिहारमधील नागररिकांचा 13 सेवाभावी संस्था शोध घेत आहेत.
पहिली रेल्वे मध्यप्रदेशला जात असताना प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली होती. दिवसभर शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशला दुसरी रेल्वे गेली. यावेळी जनता कर्फ्यूची गरज पडली नाही. मात्र उत्तर प्रदेशला जाणाऱ्या कामगारांची कमतरता भासल्याने शेवटच्या टप्प्यात शहराच्या परिसरातून फिरणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कामगारांना बोलावून आणावे लागले. तरीही रेल्वेचे पाच डबे रिकामेच गेले. या पार्श्वभूमीवर आता तसे होऊ नये. तसेच कोणता कामगार माहितीअभावी इथेच राहू नये, म्हणून प्रशासन सेवाभावी संस्थांची मदत घेत आहे.
हेही वाचा-'राज्यातील 29 हजार गरीब कुटुंबांना प्रतिदिन 200 रुपयांचे प्रतिकात्मक वाटप'
या आहेत जिल्ह्यामधील सेवाभावी संस्था आणि व्यक्ती-
प्रशासनाकडे बिहारमधील 3 हजार 8 कामगारांची नोंद आहे.
- श्याम शिरसाठ (लोकमंगल सामाजिक संस्था)
- एम.डी सरोदे (जन विकास बहुउद्देशीय संस्था )
- अरुण सरदार (कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्था)
- वंदना झिने (पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला बहुउद्देशीय संस्था )
- अमित मिसाळ (ऑइल मिल असोसिएशन).
- दत्ता पवार भास्कर पडूळ (इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च )
- प्रतीक गावंडे
- गणेश चौधरी (गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुप)
- शाकेर खान( लायमर स्पोर्ट्स अंड वेल्फेअर सोसायटी )
- विद्या जाधव (अहिल्यादेवी महिला मंडळ )
- अलोक सरव ( दि वारियर्स सोशल ग्रुप)
- ज्योती आडेकर (ज्ञानज्योत बहुउद्देशीय संस्था )यांचा समावेश आहे.
या संस्थांनी एकूण 2 हजार 602 कामगारांशी संपर्क केला. त्यापैकी 2 हजार 168 कामगारांचा संपर्क झाला. उर्वरित 1 हजार 132 कामगार उद्या जाणाऱ्या रेल्वेने जाण्यास तयार झाले आहेत. उर्वरित कामगारांमध्ये 404 कामगारांनी येणार नाही असे सांगितले. तर 339 कामगारांचे मोबाईल बंद आहेत. 95 कामगार फोन उचलत नाहीत. 257 कामगार बिहार राज्यात पोहोचले आहेत. उर्वरित कामगारांच्या अन्य काही समस्या आहेत.
उद्यापर्यंत अजूनही काही कामगार वाढण्याची शक्यता आहे. ज्या कामगारांना बिहार येथे जायचे, अशा कामगारांनी मनोज देशमुख 94 222 15 0 15 आणि रामदास जगताप 94 237 29009 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा-रस्त्यांच्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे पाडणारा व्हिडिओ व्हायरल, पाहा कसा करतायत रस्ता!