ETV Bharat / state

बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना....खासगी स्नेहमिलनात भाजप कार्यकर्त्यांचा नाश्त्यावर ताव

येथून जवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलामध्ये भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम होता. दानवे यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर वाजत-गाजत येऊन या क्रीडासंकुलात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन केले. त्यासाठी भाजपचे निवडणूक चिन्हा कमळ धारण केलेली मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

कार्यक्रम स्थळावरील पोस्टर
author img

By

Published : Apr 3, 2019, 1:35 PM IST

जालना - रावसाहेब दानवेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना कडाडून भूक लागली. ही भूक भागविण्यासाठी त्यांनी जवळच आयोजित केलेल्या गुढीपाडवा स्नेहमिलनाचा आधार घेतला. तेव्हा, बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना या म्हणीचा सर्वांना प्रत्यय आला. या खासगी स्नेहमिलन कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आगंतुक कार्यकर्ते जेव्हा नाश्त्यावर ताव मारुन गेले, तेव्हा जालनेकरांच्या मनात हीच म्हण आली असेल.

भाजप कार्यकर्त्यांनी आंगतुकपणे कार्यक्रमात नाश्ता केला

गुरुकृपा व श्री आनंदी दत्त विहार आणि संदिप पाटील यांच्यावतीने सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत इन्कम टॅक्स कॉलनी येथे गुढीपाडवा स्नेहमिलन आयोजित करण्यात आले होते. स्नेहमिलन म्हटले थाट बाट ,विद्युत रोषणाई ,आकर्षक खुर्च्या ,वाजंत्री, नटून थटून आलेले महिला मंडळ , जाकीट घातलेले पुरुष मंडळी, जेवणासाठी विविध पदार्थ आणि स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभे असलेले स्वागतोत्सुक असे साधारण चित्र डोळ्यासमोर उभे राहते . मात्र हे स्नेहमिलन रस्त्याच्या बाजूला रिकाम्या प्लॉटमध्ये आणि कुठलाही पडदा नसलेल्या फक्त छताखाली आयोजित करण्यात आले होते. इथे जे चित्र दिसले ते थोडे वेगळेच होते.

येथून जवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलामध्ये भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम होता. दानवे यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर वाजत-गाजत येऊन या क्रीडासंकुलात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन केले. त्यासाठी भाजपचे निवडणूक चिन्हा कमळ धारण केलेली मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. दोन दोन प्लेट पोहे खाल्ल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा सभेच्या ठिकाणी वळवला. त्यामुळे निवडणूक खर्ज वाचविण्यासाठी भाजपने ही युक्ती केली की काय अशी चर्चा लोकात रंगली होती.

Intro:आत्तापर्यंत दीपावली स्नेहमिलन हा स्नेह मिलनाचा एकमेव कार्यक्रम सर्वांना परिचित होता. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आणखी एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम पाहायला मिळाला, फक्त पहायलाच नाही तर उपभोगायलाही मिळाला. गुरुकृपा व श्री आनंदी दत्त विहार व संदीप पाटील यांच्यावतीने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत इन्कम टॅक्स कॉलनी आणि आदित्य नगर मित्र मंडळाच्या वतीने गुढीपाडवा स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

Body:आत्तापर्यंत बहुतांशी लोकांना दीपावली स्नेहमिलन हा एकमेव कार्यक्रम माहित आहे .परंतु या सद गृहस्थाच्या निमित्ताने गुढीपाडवा स्नेहमिलन देखील लोकांना आज अनुभवायला मिळाले .स्नेहमिलन म्हटले थाट बाट ,विद्युत रोषणाई ,आकर्षक खुर्च्या ,वाजंत्री, नटून थटून आलेले महिला मंडळ ,जाकीट घातलेले पुरुष मंडळी, जेवणासाठी विविध पदार्थ आणि स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभे असलेले स्वागतोत्सुक. असे साधारण चित्र डोळ्यासमोर उभे राहते .मात्र हे स्नेहमिलन रस्त्याच्या बाजूला रिकाम्या प्लॉटमध्ये आणि कुठलाही पडदा नसलेल्या फक्त छताखाली आयोजित करण्यात आले होते. भर दुपारची वेळ दिड-दोन वाजले ,आणि त्यातच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलामध्ये भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम म्हणजे खासदार दानवे यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर वाजत-गाजत येऊन या क्रीडासंकुलात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन केले. त्यासाठी कमळ धारी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हीच कमळधारी मंडळी या गुढीपाडवा स्नेहसंमेलनामध्ये पोह्याच्या प्लेट वर ताव मारताना दिसून आली.
या स्नेहसंमेलनात मात्र पोह याशिवाय कोणताही खाद्यपदार्थ पाहुण्यांना मिळाला नाही. ताव मारणाऱ्या मध्ये डोक्यावर भाजपाची टोपी आणि गळ्यात भगवे रुमाल असलेले कार्यकर्ते दिसत होते. दोन दोन प्लेट पोहे खाल्ल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा सभेच्या ठिकाणी वळवला .त्यामुळे आता पुन्हा हे सांगायला नको हे स्नेहमिलन कोणाचे होते आणि हे कोणासाठी होते. लोक मात्र उगीचच बोलत होते की निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठी हा फंडा वापरला की काय?

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.