ETV Bharat / state

शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊन विमा कंपनीमधील कर्मचारी पसार

विमा कंपन्या सरकारच्या निर्देशांना जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. बदनापूर येथे विमा कंपनीचे कर्मचारी आज कार्यालय बंद करून बेपत्ता झाले. त्यामुळे पीक विम्याचा क्लेम दाखल करण्यासाठी आलेल्या ५०० ते ८०० शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. ६ नोव्हेंबर रोजी पीक विमा कंपनी बंद आढळल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेकडून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊन विमा कंपन्यामधील कर्मचारी पसार
author img

By

Published : Nov 5, 2019, 4:49 PM IST

जालना - परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने विमा कंपन्यांना सांगितले आहे. मात्र, तरी देखील विमा कंपन्या सरकारच्या निर्देशांना जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. बदनापूर येथे विमा कंपनीचे कर्मचारी आज कार्यालय बंद करून बेपत्ता झाले. त्यामुळे पीक विम्याचा क्लेम दाखल करण्यासाठी आलेल्या ५०० ते ८०० शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. ६ नोव्हेंबरला पीक विमा कंपनी बंद आढळल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेकडून देण्यात आला आहे.

ठिय्या आंदोलन करताना शेतकरी

तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने हवालदिल झाले आहे. प्रशासनाने सर्व ठिकाणी पंचनामे सुरू केले असून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना क्लेमसाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन केले होते. बदनापूर येथे बजाज आलियान्स या पीक विमा कंपनीचे कार्यालय आहे. येथील कर्मचारी आज कार्यालय बंद करून गायब झाले होते. सकाळपासून सुमारे ५०० ते ८०० शेतकरी या कार्यालयासमोर भर उन्हात पीक विमा अर्ज भरण्याकरता उभे होते. ४ तास उलटूनही कोणताच कर्मचारी पीक विमा कार्यालयाकडे फिरकला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी छावा क्रांतिवीर सेनेचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड यांच्यासोबत तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयात ठिय्या मांडल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपले कर्मचारी पाठवून शेतकऱ्यांचे अर्ज घ्यायला लावले. मात्र, विमा कंपनीचे कर्मचारी प्रशासनास जुमानत नसल्याचेच चित्र येथे दिसून आले. दरम्यान, ६ नोव्हेंबरला पीक विमा कंपनी कार्यालय बंद आढळल्यास हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून उग्र अंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा- जालन्यात नवीन इमारतीसाठी पोलीस प्रशासन नरबळीच्या प्रतीक्षेत?

Intro:बदनापूर, दि. 6 (प्रतिनिधी): प्रशासन विमा कंपन्यांना परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे अर्ज स्वीकारण्यासाठी सांगत असले तरी या कंपन्या जुमानत नसल्याचे चित्र असून बदनापूर विमा कंपनीचे कर्मचारी चक्क आज कार्यालय बंद करून बेपत्ता असल्यामुळे पीक विमा क्लेम दाखल करण्यासाठी आलेल्या पाचशे ते आठशे शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. अखेर या शेतकऱ्यांनी छावा क्रांतिवीर सेनेचे पंकज जऱ्हाड यांच्यासह तहसीलदाराकडे ठिय्या आंदोलन केल्यानंतर ही विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अर्ज स्वीकारलेच नसल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसानं हवालदिल झालेला आहे. प्रशासनाने सर्व ठिकाणी पंचनामे सुरू केलेले असून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना क्लेम साठी अर्ज दाखल करावे असे आवाहन केले होते. बदनापूर येथे बजाज अलियान्स व इतर खाजगी पिकविमा कंपन्याचे कार्यालय आहे येथील कर्मचारी आज कार्यालये बंद करून गायब झालेले होते. सकाळपासून सुमारे पाचशे ते आठशे शेतकरी या कार्यालयासमोर भर उन्हात पिकविमा अर्ज भरण्याकरीता उभे होते. ४ तास उलटून ही कोणताच कर्मचारी पिकविमा कार्यालयाकडे फिरकलच नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी छावा क्रांतीवीर सेनेचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड यांच्यासोबत तहसिल कार्यालय गाठले व तहसील कार्यालयामध्येच ठियया मांडल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपले कर्मचारी पाठवून हे अर्ज घ्यायला लावले असले तरी विमा कंपनीचे कर्मचारी प्रशासनास जुमानत नसल्याचेच चित्र येथे दिसून आले. दरम्यान छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने दिनांक ०६ नोव्हेबर रोजी पिकविमा कंपनी कार्यालय बंद आढळल्या हजारो शेतकऱ्यांसह रस्तावर उतरुन उग्र अंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.Body:विमा कंपनीचे बदनापूरचे कार्यालय बंद आ
असंल्यामुळे शेतकऱ्यांनी मांडला तहसील कार्यालयात ठिय्या व तहसीलदार यांना दिले आंदोलनाचा इशारा यावेळीचे छायाचित्रे व व्हिडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.