ETV Bharat / state

जालन्यात ७० वर्षीय आजीबाईंनी दिली कोरोनाला मात; विभागीय आयुक्तांनी घेतली भेट - 70 year old women defeat corona jalna

गेल्या वर्षभरापासून कोविड आजारामुळे सर्व जगच परेशान आहे. या आजाराची काही वर्गवारी नाही. तरुण अबालवृद्ध सर्वच या आजाराने ग्रासले आहेत. अशा परिस्थितीत एका 70 वर्षीय आजीबाईंनी 25 चा स्कोर असताना देखील कोरोनावर मात केली. तिच्या इच्छाशक्तीला विभागीय आयुक्तांनी दाद दिली.

Deubai Jaibhaye defeated Corona
७० वर्षीय आजी कोरोना मात जालना
author img

By

Published : May 6, 2021, 5:49 PM IST

जालना - गेल्या वर्षभरापासून कोविड आजारामुळे सर्व जगच परेशान आहे. या आजाराची काही वर्गवारी नाही. तरुण अबालवृद्ध सर्वच या आजाराने ग्रासले आहेत. अशा परिस्थितीत एका 70 वर्षीय आजीबाईंनी 25 चा स्कोर असताना देखील कोरोनावर मात केली. तिच्या इच्छाशक्तीला विभागीय आयुक्तांनी दाद दिली आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले

हेही वाचा - जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत पोलिसांच्या साक्षीने भाजपाचे आंदोलन

यवतमाळ येथील देऊबाई जायभाये या 70 वर्षीय आजीबाईंना कोविड आजार झाला आणि त्यांना ऑक्सिजनचे बेड पाहण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. पाच दिवस यवतमाळला प्रत्येक दवाखान्यात हजेरी लावल्यानंतर देखील बेड मिळाला नाही. त्यामुळे, नातेवाईकांनी देखील आशा सोडली होती, परंतु एक शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आजीबाईंना अशा परिस्थितीत 24 एप्रिलला जालन्यात आणले. येथील एका खासगी इमेजिंग सेंटरमध्ये त्यांचे सिटीस्कॅन केले. त्यामध्ये त्यांचा स्कोअर 25 पैकी 25 आला. नातेवाईक घाबरून गेले आणि पुन्हा ऑक्सिजन बेडचा शोध सुरू झाला. कसेबसे करून सामान्य रुग्णालयातील एक बेड मिळाला. त्यांना भरती करण्यात आले. कोरोना रुग्णालयात भरती करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांप्रमाणे आजीबाईंवरही उपचार करण्यात आले आणि या उपचारांना आजीबाईंनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचसोबत त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती, त्यामुळे औषधींचा त्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम झाला आणि आज 14 दिवसानंतर त्या बऱ्या झाल्या.

अधिकाऱ्यांनाही कौतुक

वय आणि स्कोअर दोन्ही जास्त असताना देखील आजीबाई ठणठणीत बऱ्या होऊन घरी जात आहेत, याचे कौतुक आणि आनंद सर्वांनाच होत आहे. त्यातच भर पडली ती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीची. या आजीबीईंची आज सुट्टी होणार असल्याची माहिती केंद्रेकर यांना कळताच त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे या आजीबईंची भेट घेतली आणि केलेल्या उपचारांविषयी माहिती जाणून घेतली. येथील डॉक्टरांच्या उपचारामुळेच मी बरी झाली, अशी प्रतिक्रिया देखील आजीबाईंनी सर्वांसमक्ष दिली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक पद्मजा सराफ, डॉक्टर बी.बी. सानप आणि आरोग्य विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित या आजीबाईंना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

हेही वाचा - 'मराठा आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकारच जबाबदार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.