जालना - भोकरदन तालुक्यात असलेल्या केदारखेडा परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून होत असलेला वाळूचा अवैध उपसा स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडला आहे.
चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त
भोकरदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत केदारखेडा हे गाव येथे आणि या गावाच्या बाजूला पूर्णा नदीचे पात्र आहे. या नदीच्या पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळूचा अवैध उपसा होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आठ ते नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री पूर्णा नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असल्याचे लक्षात आले. तेथे छापा टाकला असता त्यांच्याकडून एक जेसीबी आणि एक हवा वाहन जप्त करण्यात आले आहे. जेसीबी वर्क वाहनाचा क्रमांक नसला तरी हवा या वाहनाचा एमएच 21 बीएच 94 95 हा क्रमांक आहे.
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत. मात्र, वाहनाच्या मालकांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकूण चाळीस लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस नाईक गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे ,जगदीश बावणे, प्रशांत लोखंडे, आदींचा समावेश होता.