ETV Bharat / state

Jalna Crime : धक्कादायक! आधी बायकोची केली हत्या, मग स्वतः संपवलं आयुष्य - Attack on wife In jalna

जालना जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घरगुती भांडणावरून आधी पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Jalna Crime
बायकोची हत्या
author img

By

Published : May 12, 2023, 9:57 PM IST

जालना: मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील खळबळजनक घटना घडली आहे. मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे संजय अंकुश पवार (वय 30) आणि त्याची पत्नी संगीता पवार (वय 27) या दोघांमध्ये घरगुती वादातून नेहमी भांडण होत होती. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास संजय पवार हा पत्नी संगीताला घर आतून बंद करून मारहाण करीत होता. संगीता हिच्या डोक्यात लोखंडी पहारीचे वार करून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली.

पत्नीला मारहाण: ही घटना घडली तेंव्हा त्यांची 8 ते 5 वर्षे वयोगटातील तीन मुले गावात खेळत होती. पत्नीला मारहाण सुरू असताना शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संजय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांही मयतांचे मृतदेह स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत.

दोन्ही मुलींना दिले विष: जालना येथे अशीच एक घटना काल घडली होती. नवरा बायकोच्या भाडंणात संतापलेल्या कृष्णा पंडित यांने पत्नी मनीषा हिला मारहाण करत तिच्या डोक्यावर विट फेकून मारली. मनीषाच्या डोक्यातून रक्त निघू लागल्याने तिने खाजगी रुग्णालय गाठले. विटेचा जोरदार फटका बसल्याने तिच्या डोक्यात सहा टाके पडले. शहागड येथील एका खाजगी रुग्णालयात तिने उपचार घेतले.तर मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास, कृष्णा पंडित त्याच्या मुली चिऊ उर्फ श्रेया आणि शिवाज्ञा या दोन्ही मुलींना शहागड येथील पैठण फाटयावरील पाहुण्याच्या वीट भट्टीवर घेऊन गेले. त्याने उंदीर मारण्याचे औषध स्वतः पिले आणि दोन्ही मुलींना देखील पाजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा -

  1. Jalna Crime नवरा बायकोच्या भांडणात चिमुरडीचा गेला जीव बापाने पाजले विष
  2. Two Murders In Jalna जालना जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून दोन्ही घटनेतील आरोपी अटकेपार
  3. Jalna Crime झोपेतच असताना तरुणाचा खून पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळची घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.