ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक: चिन्ह घेण्यासाठी जालन्यात प्रचंड गर्दी

जालना तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे.

author img

By

Published : Jan 4, 2021, 10:17 PM IST

चिन्ह घेण्यासाठी जालन्यात प्रचंड गर्दी
चिन्ह घेण्यासाठी जालन्यात प्रचंड गर्दी

जालना- जालना तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. प्रशासनाचा आणि उमेदवारांचा प्रत्यक्ष संपर्क येण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. या प्रचारासाठी आवश्यक असलेल्या चिन्हांचे वाटप आज जालना तहसीलमध्ये करण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

चिन्ह घेण्यासाठी जालन्यात प्रचंड गर्दी

जालना तालुक्याची स्थिती-

जालना तालुक्यातील एकूण 86 ग्रामपंचायतीसाठी 743 सदस्य निवडून द्यायचे होते. परंतु जालना तालुक्यातीलच श्रीकृष्ण नगरच्या एका ग्रामपंचायतची निवडणूक रद्द झाल्यामुळे आता 85 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे एकूण 740 ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार आहेत.

रात्री उशिरापर्यंत कामकाज-

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन पर्यंत हा कार्यक्रम झाल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना लगेच चिन्हांचे वाटप सुरू झाले. त्यामुळे दोन्ही कामासाठी एकच कर्मचारी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात नेमके किती उमेदवार आहेत. या सर्वांचा ताळमेळ घालण्यासाठी तहसीलमध्ये रात्री उशिरापर्यंत कामकाज चालू होते. तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

चिन्ह मिळवण्यासाठी एकच गर्दी-

तहसील कार्यालयात आलेले सर्वजण ग्रामीण भागातून आल्यामुळे प्रत्येकाला निवडणूक चिन्ह घेऊन लवकर गावाकडे परतायचे होते. त्यामुळे सर्वांनीच तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीला आवर घालताना पोलिसांच्या नाकी नऊ आले. शेवटी ध्वनिक्षेपकाच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी एक-एक गावच्या उमेदवारांना तहसील कार्यालयात सोडले. त्यामुळे कामकाजामध्ये सुसूत्रता आली होती.

हेही वाचा- राज्यात आज 2 हजार 765 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 29 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.