जालना - होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र धुलिवंदनचा उत्साह असतो. त्यालाच धुळवड असेही म्हटले जाते. रंगपंचमीप्रमाणे या दिवशी देखील नागरिक एकमेकांना रंग लावतात. जालन्यातील भोकरदन शहरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नागरिकांना धुलिवंदनच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी देखील नागरिकांना धुलिवंदनच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा... धुलीवंदनानिमित्त आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा बोहाडा उत्सव
दरम्यान, शहरातील प्रशाद गल्ली येथे दरवर्षी प्रमाणे धळवड साजरी करण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सहभागी झाले. मात्र, त्यांच्या जवळच्या एका कार्यकर्त्याचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे यावर्षी ढोलकी वैगेरे वाजवण्यात आली नाही. आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांनी घरोघरी जावून धुलिवंदनच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. असे असले तरिही भारतातही कोरोना व्हायरचा शिरकाव झाल्याने होळी आणि धुळवडीच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून आले.