ETV Bharat / state

ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जालन्यात दख्खन प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी गर्दी करत असून पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिक देखील आवर्जून येथे हजेरी लावत आहेत.

ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शन

author img

By

Published : Jan 19, 2020, 6:54 PM IST

जालना - शहरातील मामा चौक परिसरात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दख्खन प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हे प्रदर्शन नागरिकांना पाहावयास मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीची शस्त्रास्त्रे होती याचा अंदाज इथे येतो.

ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शन

जालन्यात दख्खन प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये युद्धात वापरण्यात आलेल्या लहान-मोठ्या तलवारी, गुप्ती, धनुष्यबाण, भाला, गदा, माडु म्हणजे हाताच्या मुठीमध्ये धरण्याचे एक शस्त्र आदि ठेवण्यात आली आहेत. माडु हे शस्त्र समोरच्या भागाला सुईच्या टोकाप्रमाणे असते आणि या भागाला विष लावलेले असते. त्यामुळे एखाद्यावर वार करायचा असेल तर सहज चालता चालता मुठीत धरलेले हे शस्त्र शत्रुच्या शरीरात खुपसायचे, जेणेकरून त्यातील विष हे त्याच्या शरीरात भिनले जाईल. त्यासोबत वाघनखे देखील इथे पाहावयास मिळतात. सामान्य माणसाला वाघनखे म्हणजे वाघाची नखे असेच अपेक्षित असते. मात्र हे वाघांच्या नखाप्रमाणे धारदार असून हाताच्या बोटामध्ये घालावयाचे शस्त्र आहे. झाडावर, किल्ल्यांवर चढण्यासाठी तसेच छुपे शास्त्र म्हणूनही याचा वापर केला जातो. या वाघ नखांच्या मदतीनेच छत्रपतींनी अफजलखानाचा वध केला होता.

यासोबत ज्या चिलखतांमुळे छत्रपतींचा जीव वाचला ते चिलखत कशा पद्धतीचे होते हे देखील येथे पाहावयास मिळते. आपण आपल्या गळ्यातील लॉकेटमधील प्रत्येक कडी जशी गुंफलेली असते, तशाच पद्धतीने हे चिलखत गुंफल्या जाते. लोखंडी तारांमध्ये गुंफून हे अंगात घातल्यामुळे तलवारीचा वार शरीरावर होत नाही आणि जखमही होत नाही. अशी अनेक प्रकारची शस्त्रे या प्रदर्शनात पाहायला ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहलाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे येथे सापडतात.

हेही वाचा - जालन्यात कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली. सोबतच पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिक देखील आवर्जून येथे हजेरी लावत आहेत. आत्तापर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून आणि नकली शस्त्रास्त्र पाहण्याची सवय झालेल्या जनतेला ही खरी शस्त्र प्रत्यक्ष जवळून पाहायला मिळत असल्यामुळे नागरिकांची या प्रदर्शनाला चांगलीच गर्दी होत आहे.

हेही वाचा - देवगाव-माळेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; कामाची चौकशी करण्याची मागणी

Intro:जालना शहरामध्ये मामा चौक परिसरात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दख्खन प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हे प्रदर्शन नागरिकांना पहावयास मिळत आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीची शस्त्रास्त्रे होती याचा अंदाज इथे येतो. लहान-मोठ्या तलवारी पासून, गुप्ती ,धनुष्यबाण, भाला, गदा ,आणि माडु, माडु म्हणजे हतच्या मुठी मध्ये धरन्याचे एक शस्त्र. हे शस्त्र समोरच्या भागाला सुईच्या टोकावर प्रमाणे असते . आणि या भागाला वीष लावलेले असते. त्यामुळे एखाद्यावर वार करायचा असेल तर सहज चालता चालता मुठीत धरलेले हे शस्त्र त्याच्या शरीरात खुपसायचे जेणेकरून हे वीस त्याच्या शरीरात भिनलेल्या जाईल .त्याच सोबत वाघ नख्या देखील इथे पाहावयास मिळतात. सामान्य माणसाला वाघनखे म्हणले वाघाची नखे असेच अपेक्षित आहे मात्र हे शस्त्र नाही. वाघांच्या नखा प्रमाणे धारदार मात्र हाताच्या बोटामध्ये घालावयाचे हे शस्त्र आहे. झाडावर, किल्ल्यांवर चढण्यासाठी तसेच छुपे शास्त्र म्हणूनही याचा वापर केला जातो. या वाघ नखाचा मदतीनेच छत्रपतींनी अफजलखानाचा वध केला होता. त्याच सोबत ज्या चिलखतामुळे छत्रपतींचा जीव वाचला ते चिलखत ही कशा पद्धतीचे होते हे देखील येथे पहावयास मिळते. आपण आपल्या गळ्यातील लॉकेटमधील प्रत्येक कडी जशी गुंफलेली असते तशाच पद्धतीने हे चिलखत गुंफल्या जाते. लोखंडी तारा मध्ये गुंफून हे अंगात घातल्यामुळे तलवारीचा वार शरीरावर होत नाही आणि जखमही होत नाही .या अशा अनेक प्रकारची शस्त्रे इथे पहायला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामधील कुतूहलाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनामध्ये सापडतात.

Body:प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची केलेला गर्दी सोबतच पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिक देखील आवर्जून येथे हजेरी लावत आहे आत्तापर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून आणि नकली शस्त्रास्त्र पाहण्याची सवय झालेल्या जनतेला ही खरी आणि प्रत्यक्ष जवळून पहायला मिळत असल्यामुळे इथे गर्दी होत आहे
***
सोबत बाईट आणि आणखी उज्ज्वल जोडत आहे कृपया जोडून घ्यावेत
वाघ नख यांविषयी माहिती देतानाचा देखील व्हिडिओ आहे कृपया तो आवर्जून वापरावा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.