जालना - सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत आहे. मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. सध्या राज्यात मास्कमुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्याव, असं आवाहन देखील टोपे यांनी केले. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.
Rajesh Tope on Corona : मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट ओसरेल; आरोग्यमंत्र्यांना विश्वास - राज्यात मास्कमुक्ती
सध्या राज्यात मास्कमुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.