जालना - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मुलांनासुद्धा बसलाय. आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मुलं शहरात विविध कोर्स व अभ्यासक्रमासाठी आहेत. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या गावी आहेत. पण ते घरभाडे व शैक्षणिक खर्च कसा पेलता येईल या संकटात विद्यार्थी व त्याचे पालक आहेत. सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्राद्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन असल्याने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यजनतेला आर्थिक पेचप्रसंगाला सामोरं जावं लागत आहे. याच सर्वसामान्यांची मुलं विविध कोर्स, अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद येथे विविध जिल्ह्यातून आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण आपल्याला गावी गेले आहेत. विद्यार्थ्यांना रूम भाडे देण्यासाठी समोर जावं लागेल. विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती पेचप्रसंगात असल्यामुळे रूमभाडे देणे त्यांना शक्य नाही. यासर्वं गोष्टीचा सरकारने योग्य तो विचार करावा व सर्वं विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व मासिक भाडे माफ करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.