ETV Bharat / state

विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी, दोघांविरोधात गुन्हा दाखल - जालना गुन्हे वृत्त

विवाहितेचा विनयभंग करून तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना जालन्यातल्या लक्ष्मीकांत नगर परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक मगर असे या आरोपीचे नाव आहे.

jalana news
विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी
author img

By

Published : Oct 24, 2020, 10:43 PM IST

जालना - विवाहितेचा विनयभंग करून तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना जालन्यातल्या लक्ष्मीकांत नगर परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक मगर असे या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील पीडिता ही सकाळी साडेअकराच्या सुमारास घराच्या पाठीमागे कपडे धूत होती. यावेळी शेजारीच राहणारा आरोपी दीपक मगर हा तिथे आला, आणि तिथे महिला एकटीच असल्याची संधी साधून त्याने महिलेशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र विवाहितेने आरडाओरड केल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान विवाहितेने घडलेला प्रकार पती आणि सासूला संगितला. पीडितेचा पती आणि सासू याचा जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता, त्यांना आरोपी आणि आरोपीच्या आईकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाकडून आरोपी दिपक मगर आणि त्याची आई यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.