ETV Bharat / state

विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या, भोकरदनच्या बाभुळगावातील घटना

विकत घेतलेल्या दुचाकीची ठराविक रक्कम न भरल्याने विक्रेत्याने दुचाकी ओढून नेली. हा अपमान सहन न झाल्याने 27 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

JALNA SUCIDE NEWS
विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Oct 31, 2020, 10:41 AM IST

जालना - शेतकरी आत्महत्यांचे प्रकार आपण पाहिले असतील. मात्र या शेतकऱ्याने वेगळ्याच क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या केल्याचे उदाहरण दिसून येते. विकत घेतलेल्या दुचाकीची ठराविक रक्कम न भरल्याने विक्रेत्याने दुचाकी ओढून नेली. हा अपमान सहन न झाल्याने 27 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची केली. विठ्ठल काशीनाथ मतकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विठ्ठलने दसऱ्याच्या मुहुर्तावर दुचाकी घेतली होती. ठरल्यानुसार दुचाकीची अर्धी रक्कमही भरली. मात्र, त्यानंतर काही रक्कम भरण्यासाठी पैशांचे नियोजन फसले. त्यामुळे संबधित विक्रेत्याने दुचाकी ओढून नेली. या अपमानामुळे विठ्ठलने गुरूवारी विषारी औषध घेतले. उपचार सुरू असताना रात्री त्याचा औरंगाबादमध्ये मृत्यू झाला.

दुचाकी घेण्याची इच्छा

चार वर्षांपूर्वी विठ्ठलच्या वडिलांचे छत्र हरपले होते. आई, भाऊ व पत्नी असा परिवार शेतीवर उदरनिर्वाह करत होता. मागील पाच ते सहा वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती तसेच पिकांचे होणारे नुकसान यामुळे घरात आर्थिक तणाव होता. दसऱ्याच्या दिवशी विठ्ठलने आपली दुचाकी घेण्याची इच्छा अर्धी रक्कम भरुन पूर्ण केली. मात्र कर्जबाजारीपणा आणि त्यातच आर्थिक अडचण अशा स्थितीत उर्रवरित रक्कम विक्रेत्याला देता आली. त्यामुळे दुचाकी संबधीत विक्रेत्याने ओढून नेली. यामुळे झालेला अपमान सहन न झाल्याने विठ्ठलने विष घेतले. त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.