जालना : घनसावंगी तालुक्यात पाऊस सुरू (heavy rain In Jalna) असताना सरफगव्हाण येथे शुक्रवारी (दि.१४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने तुकाराम बाळाभाऊ काळे (वय ४३) या शेतकऱ्याचा मृत्यू (farmer died due to lightning in Jalna) झाला.
शेतात काम करतानाच पडली वीज - घटनेच्या वेळी मयत हे शेतात काम करीत होते. अचानक वीज कोसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात 3-4 दिवसांसाठी गडगडाटी वादळाचा इशारा देण्यात आला होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांसाठी पुढील तीन ते चार दिवस यलो अलर्ट जारी केला (lightning killed farmer In Jalna) होता.
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान - परतीच्या पावसाचा परिणामही राज्यभरात वेगवेगळ्या भागात दिसू लागलाय. मराठवाड्यात कापूस वेचणीला आला असताना परतीच्या पावसाने तो भिजला आहे. तर सोयाबीनला अधिकच्या पावसाने कोंब फुटत आहे. अनेक ठिकाणी भात, उडीद, कांदा सारख्या पिकांना फटका बसतोय. ऊस तोडणीला अडथळे येत आहेतच सोबत चिखल साचल्याने ऊस वाहतूक करणारे वाहन देखील उसाच्या सारीपर्यंत पोहचू शकत नाहीये. ऊस तोडणी लांबणीवर गेली तर उशीर झाल्याने उसाला तुरे येतील आणि उभं पीक वाया जाईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली (lightning In Jalna) आहे.