ETV Bharat / state

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश परिस्थिती, भिंत कोसळून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Extreme rainfall in Badnapur taluka breaking

मागील दोन दिवसांपासून बदनापूर तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तालुक्यात २४ तासात ८० मि.ली. पावसाची नोंद झाली आहे. काल (दि. 13 जुलै) रात्री (११. ३०)च्या सुमारास तालुक्यातील ढासला येथे पावसामुळे भिंत कोसळून एक मुलगी ठार झाली आहे. दरम्यान, या घटनेत आजी-आजोबाही गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच मुलीचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बदनापूर तालुक्यात भिंत कोसळून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

author img

By

Published : Jul 14, 2021, 9:31 PM IST

जालना (बदनापूर) - मागील दोन दिवसांपासून बदनापूर तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तालुक्यात २४ तासांत ८० मि.ली. पावसाची नोंद झाली आहे. काल (दि. 13 जुलै) रात्री (११. ३०)च्या सुमारास तालुक्यातील ढासला येथे पावसामुळे भिंत कोसळून एक मुलगी ठार झाली आहे. दरम्यान, या घटनेत आजी-आजोबाही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी (शासकीय) रूग्णालयात हलवण्यात आले आहे. श्रवणी मदन संगोळे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर, शांताबाई सारंगधर सोनवणे (वय, ६०) सारंगधर विश्वनाथ सोनवणे (वय, ६५) आजी-आजोबाची नावे.

'मागील तीन ते चार दिवसांपासून रोज पाऊस'

तालुक्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओढ दिलेल्या पावसाने दुसऱ्या आठवड्यापासून चांगलाच जोर धरला आहे. हा पहिलाच पाऊस असल्यामुळे पिकांना म्हणावा तितका धोका झाला नाही. मात्र, अजूनही पावसाचा मारा सुरूच असल्यामुळे शेतात पाणी तुंबत आहे. काही शेतकऱ्यांच्या जमीनी खरवडून जाण्यासारखी परिस्थिती झाली, असल्यामुळे उगवलेले पिके वाहून जाण्याचा धोका आहे.

'प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे मृत्यू'

या दुर्घटनेबाबत ढासलाचे सरपंच राम पाटील यांनी थेट प्रशासनावरच आरोप केला आहे. २०१५ साली दुधना नदीला आलेल्या पुरामुळे ढासला येथील २०० ते २५० घरांचे नुकसान झाले होते. त्यावेळी देण्यात आलेली तुटपुंजी मदतही संबंधितांना मिळाली होती. त्यानंतर तत्कालिन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार, तहसीदार यांच्यासमोर या सर्व नुकसानग्रस्तांना घरे बांधून देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्यापही त्यांना घरे न दिल्यानेच ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच, २०१६ पासून ढासला ग्रामपंचायतने ३०० घरकुलांसाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वे करण्यात आला आहे. मात्र, शासनाने अद्यापही या घरकुलांना मंजुरी दिलेली नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच या मुलीचा जीव गेल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.